रक्षकच बनले भक्ष्यक! सहलीसाठी गोव्याला निघालेल्या वसईतील पोलिसांकडून नर्सिंगच्या तरुणीचा विनयभंग करत अपहरणाचा प्रयत्न-police molested young girl in sindhudurg five accused arrested in by sindhudurg police ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  रक्षकच बनले भक्ष्यक! सहलीसाठी गोव्याला निघालेल्या वसईतील पोलिसांकडून नर्सिंगच्या तरुणीचा विनयभंग करत अपहरणाचा प्रयत्न

रक्षकच बनले भक्ष्यक! सहलीसाठी गोव्याला निघालेल्या वसईतील पोलिसांकडून नर्सिंगच्या तरुणीचा विनयभंग करत अपहरणाचा प्रयत्न

Sep 28, 2024 12:43 PM IST

sindhudurg crime news : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १८ वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा पोलिसांनी विनयभंग करून तिच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ट्रॅफिक पोलिस, एक सीआयएसएफ जवान, एक एसआरपीएफ कर्मचारी आणि दोन सरकारी कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

रक्षकच बनले भक्ष्यक! सहलीसाठी गोव्याला निघालेल्या वसईतील पोलिसांकडून नर्सिंगच्या तरुणीचा विनयभंग करत अपहरणाचा प्रयत्न
रक्षकच बनले भक्ष्यक! सहलीसाठी गोव्याला निघालेल्या वसईतील पोलिसांकडून नर्सिंगच्या तरुणीचा विनयभंग करत अपहरणाचा प्रयत्न (HT_PRINT)

sindhudurg crime news : पोलिस हे जनतेचे रक्षक असतात मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हेच रक्षक भक्ष्यक बनले असल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गोव्याला सहलीसाठी जात असताना वसई येथील पोलिसांनी वाटेत एका तरुणीचा विनयभंग करत तिच्या अपहरणाचा प्रयत्न केला. ही घटना लक्षात येताच संतप्त ग्रामस्थांनी दोन पोलिसांसह पाच जणांना चांगलाच चोप दिला. यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जामसंडेमध्ये घडली. देवगड पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या सर्व आरोपींना निलंबित करण्यात आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार हरिराम मारोती गिते (वय ३४) आणि प्रवीण रानडे (वय ३२)अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. ते वसई वाहतूक पोलीस शाखेत शिपाई पदावर कर्यरत आहेत. हे दोन्ही पोलीस कर्मचारी आपले मित्र माधव केंद्रे (वय ३२), शंकर गिते (वय ३२) आणि सतवा केंद्रे (वय ३२) यांच्यासोबत रजा घेऊन सहलीसाठी गोव्याला निघाले होते. याचदरम्यान देवगड तालुक्यातील जामसंडे गावातील आनंदवाडी वळणार एक १८ वर्षांची महाविद्यालयीन तरुणी तिच्या घराकडे एकटी जात होती. ती एकटी असल्याचं पाहून पोलिसांनी तिचा विनयभंग केला. या मुलीनं झालेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं मात्र आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर या मुलीचा हात धरून तिला वाहनात खेचत पळून नेण्याचा प्रयत्न केला.

मद्यधुंद अवस्थेत असलेले आणि गणवेशात नसलेले हे सहा जण सुटी घेऊन भाड्याने घेतलेल्या एसयूव्हीमधून गोव्याला जात होते. शुक्रवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास, हे सर्व जण जामसंडे गावात थांबले होते. यावेळी नर्सिंग महाविद्यालयात जाणारी एक तरुणी ही आनंदवाडी वळणार तिच्या घरी एकटीच जात होती. यावेळी ती एकटी असल्याचं पाहून पोलिसांनी तिच्या कडे पाहून शेरेबाजी करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर त्यांनी या मुलीचा हात धरून तिला वाहनात खेचत तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने आरडाओरडा केला. ही बाब रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी या मुलीची आरोपींच्या तावडीतून सुटका करत त्यांना चांगलाच चोप दिला.

यानंतर आरोपींनी ग्रामस्थांची माफी मागितली. ग्रामस्थांनी त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यापूर्वी रस्त्यावर बसायला लावले. यावेळी आरोपी हरीराम आणि प्रवीण यांनी स्वतःची ओळख वसईचे वाहतूक पोलिस कर्मचारी असल्याचे सांगितले. तर इतर दोघांनी ते सीआयएसएफचे जवान असल्याचे सांगितले, तर दुसऱ्याने तो एसआरपीएफ जवान असल्याचे सांगितले आणि बाकीचे दोघांनी स्वतःला सरकारी कर्मचारी म्हणून ओळखले. ग्रामस्थांनी आरोपींना पोलिसांच्या हवाली केले. या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सहा जणांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाही आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती देवगडचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी दिली. निलंबनाच्या आदेशानुसार, त्यांच्या सुटकेनंतर, हरिराम आणि प्रवीण यांना मीरा रोड येथील मुख्यालयात जावे लागेल आणि पुढील सूचना मिळेपर्यंत ते कार्यक्षेत्र सोडू शकणार नाहीत. एप्रिलमध्ये तुळींज पोलिस ठाण्यात आक्षेप घेतल्याने प्रवीणला एका व्यापाऱ्याने मारहाण केल्याने त्याचा दात तुटला होता.

गुरुवारी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी देवगड पोलिस ठाणे गाठून संबंधित सरकारी विभागांना सहा आरोपींवर योग्य ती कारवाई करण्याची विनंती अधिकाऱ्यांना केली. मुलीला आरोपींच्या तावडीतून वाचवणाऱ्या स्थानिकांचेही त्यांनी कौतुक केले.

Whats_app_banner
विभाग