Maratha Aarakshan Morcha : मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटिस बजावली असून आझाद मैदानाऐवजी खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर आझाद मैदान पोलिसांची जरांगेना नोटिस दिली आहे. मुंबईच्या कोणच्याही मैदानात एवढे आंदोलक बसू शकतील एवढे मोठे मैदान नाही. त्यामुळे त्यांना नोटिस पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, या आंदोलनामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत होण्याची पोलिसांना भीती असून यामुळे अधिकाऱ्यांकडून जरांगेना नोटिस बजावण्यात आली आहे. दरम्यान, जरांगेंनी शिवाजी पार्क मैदानाची परवानगी मागितली होती. पोलिसांनी ती नाकारली असून मनोज जरांगेंना मुंबई बाहेर रोखण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पायी मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. काल पुण्यातून मुक्काम आटोपून ते लोणावळा येथे थांबले आहे. दरम्यान, पुण्यातील गर्दी पाहून सरकारचं टेंशन वाढले आहे. यामुळे सकाळीच लोणावळा येथे सरकारचे प्रतिनिधि जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते. तेथे त्यांनी आंदोलन मागे घ्यावे या साठी प्रयत्न केल्याचे देखील माहिती आहे.
दरम्यान, हायकोर्टाने देखील राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. कुठलंही आंदोलन हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश स्पष्ट आहेत. त्यासाठी तुम्हाला निर्देशांची वाट पाहण्याची गरज नाही. त्यामुळे मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत होणार नाही याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे कोर्टाने म्हटले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आज ही नोटिस जरांगे पाटील यांना बजावली आहे.
जरांगे पाटील यांच्या सोबत लाखोंच्या संख्येने आंदोलक आहे. पुण्यातील सर्व रस्ते काल बंद झाले होते. तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती, सध्या जरांगे पाटील यांचा मोर्चा हा मुंबईच्या वेशीवर आहे. हा मोर्चा मुंबईत धडकला तर मुंबईचे जीवन विस्कळीत होणार आहे.
दरम्यान, जरांगेंनी शिवाजी पार्क मैदानाची परवानगी मागितली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. त्यांनी आझाद मैदानाऐवजी खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात आंदोलन करावे असे पोलिसांनी म्हटले आहे. मुंबईच्या कोणच्याही मैदानात एवढे आंदोलक बसू शकतील एवढे मोठे मैदान नाही. त्यामुळे त्यांनी खारघर येथे आंदोलन करावे असे पोलिसांनीम्हणणे आहे. दरम्यान, जरांगे पाटील पोलिसांच्या या नोटीसीला काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला निघालेले मनोज जरांगे सध्या लोणावळा येथे आहेत. त्यानंतर जरांगे हे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून मुंबई गाठणार आहेत. दरम्यान, खबरदारी म्हणून लोणावळा येथे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या दोन्ही मार्गांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जलद कृती दल आणि बॉम्ब निकामी पथकही तैनात करण्यात आले आहेत.