सोशल मीडिया प्रोफाईल फोटोमध्ये चुकूनही 'या' लोकांचे फोटो लावू नका; पाहताच मुंबई पोलीस करणार कारवाई
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सोशल मीडिया प्रोफाईल फोटोमध्ये चुकूनही 'या' लोकांचे फोटो लावू नका; पाहताच मुंबई पोलीस करणार कारवाई

सोशल मीडिया प्रोफाईल फोटोमध्ये चुकूनही 'या' लोकांचे फोटो लावू नका; पाहताच मुंबई पोलीस करणार कारवाई

Updated Oct 26, 2024 08:45 PM IST

Mumbai Police Warning: सोशल मीडिया प्रोफाईल फोटोमध्ये गुन्हेगारांचे फोटो ठेवणाऱ्या लोकांविरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

सोशल मीडिया प्रोफाईल फोटोमध्ये चुकूनही 'या' लोकांचे फोटो लावू नका
सोशल मीडिया प्रोफाईल फोटोमध्ये चुकूनही 'या' लोकांचे फोटो लावू नका

Mumbai Police News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील त्यांचे आमदार-पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिश्नोई टोळीने सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. मात्र, तेव्हापासून गँगस्टर लॉरेन्स बिश्रोई आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांचे फोटो अनेकांच्या सोशल मीडिया प्रोफाईलमध्ये दिसू लागले. मात्र, यापुढे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांचे प्रोफाईल फोटो किंवा त्यांच्या संबंधित सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अनेकजणांच्या सोशल मीडिया प्रोफाईलमध्ये लॉरेन्स बिश्नोई किंवा दाऊद इब्राहिम यांसारख्या गुन्हेगारांचे फोटो दिसून आले. सोशल मीडिया प्रोफाईलमध्ये कोणत्याही गुन्हेगाराचा फोटो वापरणे म्हणजे त्यांचे समर्थन आहे. चुकूनही अशा लोकांचे फोटो आपल्या प्रोफाईल फोटोमध्ये लावू नये, याबाबत मुंबई पोलीस लोकांना सावध करत आहेत.

बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपीच्या घरातून शस्त्र जप्त

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपीच्या घरातून मुंबई पोलिसांनी शस्त्र जप्त केले आहे. रायगड येथील आरोपी राम फुलचंद कनौजिया याच्या घरातून हे शस्त्र जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांनी नोंदवलेल्या पाच शस्त्रांपैकी एकूण चार शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी एका पिस्तुलाचा शोध सुरू आहे.

आरोपींच्या मोबाईलमध्ये सापडले पुरावे

हल्लेखोरांच्या मोबाइलची तपासणी केली असता त्यात पिस्तुलांचे फोटो सापडले. त्यानंतर चौकशीनंतर गुन्हे शाखेने चौथ्या शस्त्राचा शोध सुरू केला. मुंबई पोलिसांनी लुधियाना येथून सुजीत कुमार या आणखी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला लुधियानातील सुंदर नगर भागातून अटक करण्यात आली आणि त्याला जमालपूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि तेथून त्याला मुंबईला नेण्यात आले. विशेष म्हणजे सुजित हा मुंबईत राहतो आणि सासरच्या घरी आला होता.

बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींचं ट्वीट

झिशान सिद्दिकी यांनी आपल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की,'गरीब निष्पाप लोकांचे आयुष्य आणि घरे वाचवताना माझ्या वडिलांनी आपला जीव गमावला आहे. आज माझे कुटुंब पूर्णपणे कोसळले आहे, मला न्याय हवा आहे, माझ्या कुटुंबाला न्याय हवा आहे. मात्र माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण होऊ नये आणि त्यांचे प्राण व्यर्थही जाऊ नयेत.'

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर