Jitendra Awhad: पत्रकार परिषद सुरू असतानाच घरात पोलीस शिरल्याने आव्हाडांचा संताप; म्हणाले, अक्कल आहे का? पाहा VIDEO
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jitendra Awhad: पत्रकार परिषद सुरू असतानाच घरात पोलीस शिरल्याने आव्हाडांचा संताप; म्हणाले, अक्कल आहे का? पाहा VIDEO

Jitendra Awhad: पत्रकार परिषद सुरू असतानाच घरात पोलीस शिरल्याने आव्हाडांचा संताप; म्हणाले, अक्कल आहे का? पाहा VIDEO

Jan 03, 2025 05:56 PM IST

Jitendra Awhad : पोलीस कर्मचारी आव्हाडांवर नजर ठेवत घरात शुटिंग करत असल्याचं समोर आलं आहे. ही बाब लक्षात येताच त्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या घरातच ठेऊन घेतले आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलीस शिरला.
जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलीस शिरला.

Jitendra awhad PC : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घरात दुपारी त्यांच्या पत्रकार परिषद सुरू असतानाच ठाणे स्पेशल ब्रांचचे पोलीस कर्मचारी आव्हाडांवर नजर ठेवत घरात शुटिंग करत असल्याने जितेद्र आव्हाड संतापले. आव्हाडांच्या घरात पोलिसांनी व़ॉच ठेवल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचारी आव्हाडांवर नजर ठेवत घरात शुटिंग करत असल्याचं समोर आलं आहे. ही बाब लक्षात येताच त्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या घरातच ठेऊन घेतले आहे. कितीही रात्र झाली तरी त्याला सोडणार नसल्याचे आव्हाड म्हणाले.

पोलीस सरकारच्या सांगण्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांवर वॉच ठेवत आहेत का, असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिकी कराडवर वॉच ठेवावा. माझ्या खासगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस घुसतात कसे? सरकारला नक्की वॉच ठेवून काय करायचे आहे? असा सवाल आव्हाड यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्य़ांना फोन करून विचारले आहेत. जोपर्यंत तुमचे वरिष्ठ अधिकारी इथं येऊन याबाबत खुलासा करत नाहीत, तोपर्यंत मी या पोलीस कर्मचाऱ्याला सोडणार नाही. मग, रात्र झाली तरी चालेल, असा संताप आव्हाड व्यक्त करत पोलिसांना दम भरला आहे.

काय आहे प्रकरण –

कळवा-मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे विवियाना मॉल परिसरात निवासस्थान आहे. येथे अनेकदा त्यांच्या पत्रकार परिषदा होत असतात. वाल्मीक कराड प्रकरणानंतर त्यांना पत्रकार परिषदांचा धडाका लावत सरकारला कोंडीत पकडले आहे. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता ठाण्यातील निवासस्थानी त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी वार्तांकन व चित्रीकरण करत होते. याच दरम्यान,एक व्यक्ती पत्रकारांच्या गराड्यात शिरला आणि त्याने मोबाईलमधून आव्हाड व तेथे उपस्थित लोकांचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना याचा संशय आल्याने त्यांनी या व्यक्तीला बाजुला घेऊन विचारणा केली.

त्यानंतर आव्हाडांनी तुम्हाला अक्कल आहे का, असा संताप व्यक्त करत प्रश्नांची सरबत्ती केली. संबंधित कर्मचारी पोलिसांच्या विशेष शाखेतील वर्तकनगर विभागात कार्यरत असल्याचे समजते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार घरात शिरून चित्रीकरण करत असल्याची कबुली त्याने दिली आहे. दरम्यान संबंधित पोलीस कर्मचारी अडचणीत येऊ नये व त्याच्या नोकरीवर गदा येऊ नये म्हणून आव्हाडांनी त्याला सोडून दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर