मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhaji Nagar : हिंदू गर्जना मोर्चात बसवर दगडफेक, फलकांची तोडफोड; चौघांविरोधात गुन्हा
Hindu Garjana Morcha Sambhaji Nagar
Hindu Garjana Morcha Sambhaji Nagar (HT)

Sambhaji Nagar : हिंदू गर्जना मोर्चात बसवर दगडफेक, फलकांची तोडफोड; चौघांविरोधात गुन्हा

20 March 2023, 13:30 ISTAtik Sikandar Shaikh

Sambhaji Nagar : औरंगाबादच्या नामांतराच्या समर्थनार्थ हिंदू संघटनांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये विराट मोर्चा काढला होता. त्यात बसवर दगडफेक करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hindu Garjana Morcha Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ हिंदू संघटनांनी काढलेल्या विराट मोर्चात सिटी बसवर दगडफेक करत फलक तोडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी औरंगाबाद नावाचे फलक असणाऱ्या बस, सार्वजनिक शौचालयं आणि दुकानांवरील फलकांवर आंदोलकांनी दगडफेक केली होती. त्यानंतर आता पोलिसांनी चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

छत्रपती संभाजीनगरमधील हिंदू संघटनांच्या मोर्चावेळी शहरात ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु मोर्चा सुरू असतानाच काही तरुणांनी औरंगाबाद नाव असलेल्या बसवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. याशिवाय काही फलकांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी चार ठाण्यात सात गुन्हे दाखल केले आहेत. शहरातील महात्मा फुले चौकातील एका चहाच्या स्टॉलवर दगड आणि वीटांचा मारा करण्यात आला. त्यामुळं मोर्चात एकच गोंधळ उडाला. याशिवाय निराला बाजार परिसरातील डान्स क्लासेसच्या इमारतीवर १० ते १५ तरुणांनी दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

हिंदू गर्जना मोर्चात दगडफेक केल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी दुर्गेश सचिन चव्हाण, विकी गोरखनाथ हेगडे, सुनील सुभाष बोराडे, विशाल कृष्णा लांडे आणि सिद्धार्थ किशोर काळे यांच्यासह पंधरा जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली आहे. याशिवाय या प्रकरणात शहरातील अन्य पोलीस ठाण्यातही आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.