बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पुण्यातून तिसरी अटक, कोण आहे शुबू लोणकर?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पुण्यातून तिसरी अटक, कोण आहे शुबू लोणकर?

बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पुण्यातून तिसरी अटक, कोण आहे शुबू लोणकर?

Published Oct 13, 2024 10:47 PM IST

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पुण्यातून तिसरी अटक करण्यात आली आहे.पुण्यातून प्रवीण लोणकरला अटक केली आहे.

बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट
बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राज्यात खळबळ माजली असून अनेक मंत्र्यांचे तसेच अभिनेता सलमान खान यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर येतआहे. या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात असल्याची माहिती असून या प्रकरणात तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी बिश्नोई गँगचे सदस्य असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मुंबईतील वांद्रे पूर्व येथे निर्मलनगर भागात बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. या प्रकरणात पुण्यातून तिसरी अटक करण्यात आली आहे.पुण्यातून प्रवीण लोणकरला अटक केली आहे. २८ वर्षीय लोणकरचा पोलीस शोध घेत होते. बाबा सिद्धिकींच्या हत्येच्या कटाततो व त्याचा भाऊ शुभम लोणकर सहभागी असल्याचा आरोपआहे.

बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर शुभम लोणकर याने शुबू लोणकर याच्या नावानेएक पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. लॉरेन्स बिष्णोई गँगने ही हत्या केल्याचा दावा त्याने पोस्टमधून केला.होता.

प्रकरणी पोलिसांनी आता त्याच्या मोठ्या भावाला प्रवीण लोणकरला अटक केली आहे. प्रवीण लोणकर हा बिश्नोई गटातील एक सूत्रधार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याने भाऊ शुभम सोबत धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम यांना टोळीत सामील करून घेतलं.

बाबा सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्विकारली असल्याचीफेसबूक पोस्ट व्हायरल होत आहे. शुबू लोणकर या नावानंहीपोस्ट आहे. हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या या पोस्टची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी सुरु झाली आहे.फेसबुक पोस्ट करणारा शुबू लोणकर हा मूळ शुभम रामेश्वर लोणकर आहे का?याचा तपास केला जातं आहे. अकोलापोलीसअकोट तालुक्यातील निवरी बुद्रुक गावात लोणकर याच्या घरी पोहोचले होते. मात्र त्याच्या घराला कुलूप होतं.

लोणकर बंधूंचे नेटवर्क दुबईपर्यंत -

शुभम लोणकर अकोला पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.  शुभमचे नेटवर्क दुबई आणि इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पसरले आहे. शुभम लोणकर हा अकोल्यातील अकोट येथील रहिवासी आहे.  फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी त्याला शस्त्रास्त्र तस्करीच्या आरोपाखाली पुण्यातून अटक केली होती.  त्याच्याकडून तीन पिस्तूल आणि १४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. शुभमचे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्याशी संबंध असल्याचे उघड झालंय. लोणकर आणि लॉरेन्स बिश्नोई या दोघांच्या संभाषणाचं कॉल रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे.

लोणकर बंधू २०१४ पासून गावातून परागंदा -

नेव्हरी गावातील शुभम लोणकर मागील काही काळापासून बिश्नोई गँगशी संपर्क आहे.अकोला व अकोट पोलिसांनी त्याच्या मूळगावात शोध घेतला. मात्र,  त्याच्यासह भावाने जून २०२४ पासून गाव सोडले होते.  बिष्णोई गँगशी संबंध असलेल्या  शुभम लोणकर व त्याच्या भावाचा शोध घेणाऱ्या पोलिसांना ते दोघेही घरी आढळले नाहीत. वर्ष २०२४ पासून दोघेजण अकोट सोडून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर