Nagpur Sex Racket : नागपुरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दापाश; पोलिसांकडून सात आरोपींना बेड्या
Nagpur Sex Racket : आरोपी ग्राहकांना घेवून हॉटेलमध्ये येत होते. देहव्यापारासाठी बाहेरच्या राज्यातून तरुणींना आणण्यात आलं होतं.
Nagpur Sex Racket News Today : एका महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता नागपूर शहर आणखी एका धक्कादायक घटनेने हादरलं आहे. नागपूर पोलिसांनी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेट प्रकरणचा भांडाफोड केला आहे. जिल्ह्यातील खाप्याजवळ सुरू असलेल्या या वेश्याव्यवसाय प्रकरणात पोलिसांनी हॉटेलमालकासह सात आरोपींना अटक केली आहे. तसेच दोन परराज्यातील मुलींची पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील न्यू एकांत लॉजवर हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय बळजबरीने सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील खाप्याजवळील न्यू एकांत लॉजवर आरोपींकडून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून न्यू एकांत लॉजवर छापा मारला. त्यावेळी चार ते पाच ग्राहक नको त्या अवस्थेत हॉटेलमध्ये आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलच्या मालकासह सात आरोपींना अटक केली आहे. तसेच परराज्यातील तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. परराज्यातील तरुणींची फसवणूक करून त्यांना वेश्याव्यवसायासाठी नागपुरात आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी विनित पाटील आणि पंकज सरीले यांना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
नागपूर पोलिसांनी सुटका केलेल्या तरुणींमध्ये एक मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. ती दहावीत शिकत असून आरोपींनी तिच्याकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करवून घेतला. सौरव तिवारी, क्षितीज चौकसे, सुरेंद्र होले आणि संजय बिबरे या चार ग्राहकांनाही पोलिसांनी हॉटेलमधून ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती खाप्याचे ठाणेदार मनोज खडसे यांनी दिली आहे. तसेच हॉटेलमध्ये आढळलेल्या मुलींची सुटका करण्यात आली असून त्यांना सुधारगृहात पाठवण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.