Pune Crime News : गुन्हेगारांच्या समर्थनार्थ रिल्स शेयर करून फसला; पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीची माफी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime News : गुन्हेगारांच्या समर्थनार्थ रिल्स शेयर करून फसला; पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीची माफी

Pune Crime News : गुन्हेगारांच्या समर्थनार्थ रिल्स शेयर करून फसला; पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीची माफी

Aug 23, 2023 12:25 PM IST

Hadapsar Crime News Marathi : आरोपी तरुणाने गुन्हेगारीचं समर्थन करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं आहे.

Hadapsar Pune Crime News Marathi
Hadapsar Pune Crime News Marathi (HT)

Hadapsar Pune Crime News Marathi : पुण्यात कोयता गँगने धुमाकूळ घातलेला असतानाच आता हडपसरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. गुन्हेगारीचं समर्थन करणारं रिल्स सोशल मीडियावर शेयर केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून त्याची चौकशी सुरू केली आहे. हडपसर येथील महम्मदवाडी येथील तरुणाने आक्षेपार्ह व्हिडिओ शेयर केला असून त्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आरोपी तरुणाने व्हिडिओद्वारे माफी मागितली आहे. त्यानंतर आता हडपसरमध्ये खळबळ उडाली असून वादग्रस्त रिल्सला शेयर तसेच लाईक न करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील हडपसरच्या महंमदवाडी येथील एका २० वर्षीय तुरुणाने 'हे हडपसर गाव आहे, इथं दुनियादारी नाही गुन्हेगारी चालते', असा आशयाचे रिल्स तयार करून सोशल मीडियावर शेयर केला होता. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांना त्यावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपीने पोलिसांची माफी मागत असे प्रकार पुन्हा करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात आरोपीने एक व्हिडिओ पोस्ट करून माफी मागितली आहे.

हडपसर पोलिसांनी आरोपी तरुणाला शिंदे वस्ती परिसरातून ताब्यात घेतलं आहे. आरोपीकडून पोलिसांनी लोखंडी हत्यार जप्त केलं आहे. याशिवाय हजारोंचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. तरुणाने रिल्स शेयर केल्याप्रकरणी आरोपीने माफी मागितली असली तरी पोलिसांनी अवैध हत्यार बाळगल्या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळं पोलिसांनी अटकेत असलेल्या तरुणावर गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर