मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kothrud Crime News : बालिकेला कोपऱ्यात नेवून अश्लील कृत्य; पोलिसांकडून नराधमाला बेड्या

Kothrud Crime News : बालिकेला कोपऱ्यात नेवून अश्लील कृत्य; पोलिसांकडून नराधमाला बेड्या

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 18, 2023 10:41 AM IST

Pune Crime News Marathi : मुलीला फिरवून आणण्याचं आमिष दाखवत आरोपीने तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Pune Crime News Marathi
Pune Crime News Marathi (HT_PRINT)

Kothrud Crime News Marathi : ठाण्यातील महिलेवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्याती संतापजनक घटना समोर आली आहे. कोथरुडमधील एका सोसायटीत चार वर्षांच्या मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. राजेश चोरगे असं आरोपीचं नाव असून त्याला कोथरुड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपीने मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचं समजताच नागरिकांनी आरोपीला चोप देत पोलिसांच्या हवाली केलं आहे. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोथरुड भागातल्या एका सोसायटीत चार वर्षांची मुलगी खेळत होती. त्यावेळी आरोपी राजेश चोरगे तिथं आला. मुलीला फिरवून आणतो, असं सांगत आरोपीने चिमुकलीला सोसायटीच्या एका कोपऱ्यात नेलं. त्यानंतर तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. परंतु मुलीला त्रास होताच तिने जोरजोरात रडायला सुरुवात केली. त्यावेळी घडलेला प्रकार समजताच रहिवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लोकांनी आरोपीला धक्काबुक्की करत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. बालिकेच्या आजोबांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी राजेश चोरगे याला अटक केली आहे.

आरोपी राजेश चोरगे हा त्यात सोसायटीत राहणारा रहिवासी आहे. पीडित चिमुकलीच्या आई-वडिलांशी त्याची चांगली ओळख होती. त्यामुळंच त्यांनी चिमुकलीला आरोपीसोबत फिरायला जाण्याची परवानगी दिली. परंतु आरोपी राजेशने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याने कोथरुड परिसरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात एका महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता एका चिमुकलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

WhatsApp channel