उत्तराखंडमधील ‘मशरूम लेडी’ला भावासह अटक; कोण आहे ही बाई आणि काय आहे प्रकरण?-police arrest uttarakhands mushroom lady divya ravat and her brother for financial fraud ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  उत्तराखंडमधील ‘मशरूम लेडी’ला भावासह अटक; कोण आहे ही बाई आणि काय आहे प्रकरण?

उत्तराखंडमधील ‘मशरूम लेडी’ला भावासह अटक; कोण आहे ही बाई आणि काय आहे प्रकरण?

Feb 13, 2024 09:48 AM IST

Uttarakhands mushroom lady arrested by Pune Police : मशरूम शेतीसाठी उत्तराखंडची ब्रँड ॲम्बेसेडर आणि नारी शक्ती पुरस्कार विजेती दिव्या रावत हिला तिचा भाऊ राजपाल रावत या दोघांना अटक करण्यात आली आहे.

Uttarakhands mushroom lady arrested by Pune Police
Uttarakhands mushroom lady arrested by Pune Police

Uttarakhands mushroom lady arrested by Pune Police : मशरूम शेतीसाठी उत्तराखंडची ब्रँड ॲम्बेसेडर आणि नारी शक्ती पुरस्कार विजेती दिव्या रावत हिला तिचा भाऊ राजपाल रावत सह पुण्यातील एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील भुकुम येथील जितेंद्र नंदकिशोर बखडा यांची २०२२ मशरूम व्यवसायात मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. त्यांनी या प्रकरणी वर्षभरापूर्वी तक्रार केली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि ९) दिव्या आणि तिचा भाऊ राजपाल रावत यांना अटक करण्यात आली.

SC on Breakup : हार्टब्रेक बनला आयुष्याचा भाग! प्रेमभंग व आत्महत्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दिव्या रावत हिला तिचा भाऊ राजपाल रावत हिने तक्रारदार यांना एक नवे फिटनेस उत्पादन लॉन्च करणार असल्याची बतावणी करत या साठी डेहराडूनमध्ये मोठे शोरूम उघडण्याची त्यांची योजना आहे. यातुन मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ देण्याचे आमिष रावत यांनी तक्रारदार यांना दाखवले. या साठी आरोपी यांनी तक्रारदार यांच्याकडून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम लुबाडली. दरम्यान, तक्रार दाराने ठरलेली रक्कम आरोपींना मागीतली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. एवढेच नाही तर तक्रारडर यांच्यावर खोटी केस दाखल करण्याची धमकी देखील देण्यात आली. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या प्रकरणी फिर्यादीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार दिव्या रावत हिला तिचा भाऊ राजपाल रावत यांच्यावर २०२२ मध्ये डेहराडूनमध्ये बनावट प्रतिज्ञापत्रासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune Air Pollution : वाहतूककोंडी नंतर आता पुण्यात प्रदूषण वाढले! शहरातील 'हे' भाग सर्वाधिक प्रदूषित

तक्रारदार बखडा हे सॉफ्टवेअर कन्सल्टन्सी फर्म चालवतात. २०१९ मध्ये त्यांनी कृषी क्षेत्रातील पर्यायी संधी शोधण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला डेहराडूनमध्ये मशरूमच्या शेतीबद्दल माहिती मिळाली. या बाबत माहिती घेण्यासाठी त्यांनी शकुंतला राय यांच्याशी संपर्क साधला. तसेच याची माहिती देखील घेतली.

तक्रारदार हे तांत्रिक प्रशिक्षण घेण्यासाठी डेहराडूनला गेले. या ठिकाणी त्यांची भेट ही दिव्या रावतशी झाली. नंतर, त्यांनी दिव्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये मोठ्या आर्थिक लाभच्या आमिषाने गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. यात सौम्या फूड्स, माउंटन मशरूम आणि इतर कंपन्यांचा ‘व्यवसाय भागीदार’ म्हणून त्यांच्या समावेश करण्यात आला. मात्र, या बाबत बाखडा यांच्याशी करार करण्यात आला नाही. बाखडा यांनी २०१९ ते २०२२ पर्यंत दिव्या रावतच्या कंपनीत १ कोटी २० लाख रुपयांची गुंतवणूक केली.

७ जून २०२२ रोजी, बाखडा यांनी दिव्याला व्यवसायातील खर्चाचा तपशीलवार तपशील पाठवला तसेच तिला ५७,५८,१९७ भरण्यास सांगितले. मात्र, दिव्याने ही रक्कम भरण्यास नकार दिला. उलट बाखडा यांच्या विरोधात उत्तराखंडमध्ये गुन्हा दाखल केला. बाखडा यांनी भागीदार म्हणून १.२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, त्यांनी त्यांचा हिस्सा मागितल्यावर भाऊ-बहिणीच्या जोडीने बाखडा यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि त्यांना ३२ लाख रुपयांची खंडणी मागितली.

पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मनोज कुमार यादव म्हणाले, “प्रथम दृष्टीने असे दिसते की संशयिताने तक्रारदारास व्यवसाय भागीदार म्हणून गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले आणि नंतर गुंतवणुकीची मागणी केल्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. आमच्या टीमने डेहराडूनला भेट दिली आणि पुरावे गोळा केले.

यादव यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदाराला भावंडांना पुण्यात येण्यास सांगण्यास सांगितले आणि खाते सेटल करण्यासाठी बाखडा यांच्याकडून डिमांड ड्राफ्ट म्हणून १० लाख रुपये घेण्यास सांगितले. जेव्हा हे दोघे डिमांड ड्राफ्ट स्वीकारण्यासाठी आले, तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक केली. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४१७, ५०६, ३४, ४६७, ४६८, ४७१ आणि १२० (बी) अन्वये पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २०१६ मध्ये आरोपी दिव्या रावत हिला नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

विभाग