दौंड तालुक्यात मोठी दुर्घटना घ़डली आहे. येथील एका रासायनिक कंपनीत विषारी वायूची गळती झाल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दोन कामगारांची प्रकृती अत्यावस्थ असल्याचे सांगितले जात आहे. दौंड तालुक्यातील भांडगाव येथे असणाऱ्या एका कंपनीत ही घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
गुरूवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भांडगाव येथील एका कंपनीत रासायनिक ॲसिडच्या ड्रमला आग लागली होती. आग विझवण्यासाठी अग्निबंबाचा वापर केल्याने परिसरात विषारी वायू पसरला. याच्या विषारी वायुच्या संपर्कात आल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. अमोल चौधरी असे मृत्यू झालेल्या कारगाराचे नाव आहे.
कंपनीतीत ठेवलेले ॲसिडचे ड्रम पलटल्याने कंपनीत अचानक आग लागली. आग विझविण्यासाठी कामगारांकडून अग्निबंब वापरण्यात आला. त्यातून विषारी धूर तयार झाला होता. हा धूर कामगारांच्या नाका तोंडात गेल्याने अनेकांची प्रकृती बिघडली.
काम करत असताना कामगारांना कोणताही त्रास जाणवला नाही, मात्र घरी गेल्यानंतर ३ कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.