कुर्ला ते वांद्रे दरम्यान ट्रॅफिक समस्येतून सुटकारा मिळवण्यासाठी राज्य सरकारने नवा प्लान तयार केला आहे. या मार्गावर जमिनीवर खुपच कमी जागा उपलब्ध असल्याने प्रवाशांना त्यांच्या गंतव्य स्थानी वेगाने पोहोचवण्यासाठी पॉड टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पॉड टॅक्सीसाठी कुर्ला रेल्वे स्टेशन ते बांद्रा रेल्वे स्टेशन दरम्यान जमिनीवरून विशेष मार्ग तयार केला जाईल.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने दिलेल्या माहितीनुसार वांद्रे ते कुर्ला स्थानका दरम्यान वांद्रे–कुर्ला संकुलामधून ‘पॉड टॅक्सी’ धावणार असून त्याची लांबी ८.८० कीमी एवढी आहे. त्यामध्ये ३८ स्थानके असणार आहेत. प्रति पॉड सहा प्रवासी एवढी त्याची क्षमता आहे. कमाल ४० किमी प्रति तास एवढा त्याचा वेग असणार आहे, हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर सुरू करण्यास मुख्यमंत्री यांनी मान्यता दिली. या प्रकल्पामुळे वांद्रे स्थानक ते बीकेसी हा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
पॉड टॅक्सी सेवेसाठी कुर्ला ते वांद्रे दरम्यान एलिवेटेड मार्ग तयार केला जाईल. प्रवाशांना काही मिनिटांच्या अंतराने हवाई टॅक्सी सेवा उपलब्ध असेल. एलिवेटेड मार्ग असल्याने आकाशात धावणारी पॉड टॅक्सी रस्ते मार्गाच्या तुलनेत कमी वेळेत गंतव्य स्थानी पोहोचवेल. सहा प्रवासी टॅक्सी बुक करून मधल्या कोणत्याही स्टेशनवर न थांबता प्रवास करू शकतात.
पॉड टॅक्सी कुर्ला रेल्वे स्टेशन ते मीठी नदी पार करून बीकेसी मधील जी ब्लॉक, ई-ब्लॉक मधून कलानगर नंतर वेस्टर्न रेल्वेवरील वांद्रे रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचले. बीकेसी मुंबईतील फायनाशिंयल हब आहे. देशी व परदेशातील अनेक मोठ्या कंपन्यांचे व बँकेचे मुख्यालय बीकेसीत आहे. कामानिमित्त दररोज हजारो लोक बीकेसीत येत असतात. या प्रॉजेक्टचा लाभ बहुतांश लोकांना देण्यासाठी टॅक्सी स्टॉप, बीकेसी कनेक्टर, एमसीए ग्राउंड, यूएस काउंसलेट आणि एनएसई जंक्शनच्या जवळ याचे थांबे असतील.
संबंधित बातम्या