मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  काळ आला होता पण…; पुण्यात शिंदवणे घाटात PMPML बसचे ब्रेक फेल

काळ आला होता पण…; पुण्यात शिंदवणे घाटात PMPML बसचे ब्रेक फेल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 20, 2022 04:53 PM IST

काळ आला होता पण वेळ नाही, या म्हणीचा प्रत्यय शुक्रवारी आला. शुक्रवारी सासवड येथून उरूळीकांचन येथे निघालेल्या बसचे शिंदवणे घाटात अचानक ब्रेक फेल झाले. मात्र, बस चालकाने न घाबरता प्रसंगावधान राखत बसवरील ताबा कायम ठेवत शिताफीने बस थांबवली.

पीएमपीएमएल
पीएमपीएमएल

पुणे : काळ आला होता पण वेळ नाही, या म्हणीचा प्रत्यय शुक्रवारी आला. शुक्रवारी सासवड येथून उरूळीकांचन येथे निघालेल्या बसचे शिंदवणे घाटात अचानक ब्रेक फेल झाले. मात्र, बस चालकाने न घाबरता प्रसंगावधान राखत बसवरील ताबा कायम ठेवत शिताफीने बस थांबवली. यामुळे जवळपास २२ प्रवाशांचे प्राण वाचले. चालकाच्या या साहसी कृतीमुळे प्रवाशांनी त्यांचे आभार मानले.

सासवड ते उरूळीकांचन बस सेवा ही नागरिकांच्या मागणीनुसार काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली आहे. ही गाडी शुक्रवारी सकाळी नेहमी प्रमाणे सात वाजता उरूळीकांचन येथे जाण्यासाठी निघाली. यावेळी गाडीत जवळपास २२ प्रवासी बसले होते. बस शिंदवणे घाटात येताच अचानक गाडीचे बे्रक फेल झाले. बस चालक किशोर कदम यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी न घाबरता. बस ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तीव्र उतार घाटात होते. त्यांनी पहिल्या दोन तीव्र वळणावरून गाडी व्यवस्थित नेली. तिस-या वळणावर त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या खडीवर गाडीनेत गाडी बंद केली. खडीवर गेल्यामुळे गाडीचा वेगही मंदावला आणि बस थांबली. या घटनेत एकाही प्रवाशाला साधे खरचटलेही नाही. चालक सुरेश कदम यांनी योग्यरित्या परिस्थीती हाताळत सुखरूप पणे या घटनेतून प्रवाशांना वाचवले.

दरम्यान, अचानक बसचे ब्रेक फेल झाल्याने या गाड्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. पुणे शहरात, उपनगरात तसेच ग्रामीण भागात पीएमपीएमएलची बस सेवा आहे. या बसमधून मोठ्या प्रमाणात दररोज हजारो नागरिक हे प्रवास करत असतात. दरम्यान पीएमपीएमएलच्या ताफ्यात अनेक कालबाह्य आणि नादूरूस्त बस गाड्या आहे. ब-याच वेळा या गाड्या रस्त्याच्या मधोमध बंद पडतात. यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. सुदैवाने या दुर्घटनेत किशोर कदम यांनी गाडी व्यवस्थित हाताळल्याने मोठी दुर्घटना टळली.

WhatsApp channel

विभाग