मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Zika Virus: झिका रुग्णाची माहिती देण्यास उशीर, पुणे महापालिकेची खासगी रुग्णालयाला नोटीस

Zika Virus: झिका रुग्णाची माहिती देण्यास उशीर, पुणे महापालिकेची खासगी रुग्णालयाला नोटीस

Jun 30, 2024 03:59 PM IST

PMC Warns Private Hospital Over Zika Virus: झिका व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णाची माहिती उशीरा दिल्यामुळे पुणे महापालिकेने हडपसर येथील नोबेल रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस पाठवली.

झिका रुग्णाची माहिती देण्यास उशीर झाल्याने पुणे महापालिकेचे खासगी रुग्णालयाला नोटीस
झिका रुग्णाची माहिती देण्यास उशीर झाल्याने पुणे महापालिकेचे खासगी रुग्णालयाला नोटीस

Zika Virus In Pune: झिका रुग्णाबाबत उशीरा माहिती दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेने हडपसर येथील नोबेल रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४७ वर्षीय महिलेच्या नमुन्यांमध्ये १ जून रोजी झिका विषाणूची लागण झाली होती. मात्र, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर तीन आठवड्यांनंतर रुग्णालयाने पालिकेला कळवले.

मनपा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला ताप, सांधेदुखी आणि डोकेदुखी अशी लक्षणे होती. तिला ३१ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिचे नमुने ट्रॉपिकल फिव्हर प्रोफाइल चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. खासगी प्रयोगशाळेच्या अहवालात १ जून रोजी तिच्या रक्ताच्या सीरममध्ये झिका व्हायरस आणि डेंग्यूचे विषाणू आढळले. मात्र, रुग्णालयाने २२ जून रोजी मनपाला या प्रकरणाची माहिती दिली.

ट्रेंडिंग न्यूज

मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळवंत म्हणाल्या, 'आम्ही नोबेल रुग्णालयाला पत्र देऊन भविष्यात अशा चुका टाळण्याचा इशारा दिला आहे. एखाद्या रुग्णाला कोणतेही अधिसूचित आजार किंवा झिका विषाणूचा संसर्ग आढळल्यास रुग्णालयाने प्राधान्याने पीएमसीला कळविण्यास सांगितले आहे. मनपाला माहिती देण्यास उशीर झाल्याने रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाळत ठेवणे आणि प्रतिबंधात्मक कामांमध्ये दिरंगाई होते.

२२ वर्षाच्या तरुणाला झिका विषाणूची लागण

झिका विषाणूप्रकरणाची माहिती रुग्णालयाने मनपाला दिल्यानंतर पालिकेने मुंढवा परिसरात पाळत ठेवण्यास सुरुवात केली. पीएमसीने ४७ वर्षीय महिला आणि तिच्या कुटुंबातील तीन सदस्य आणि आसपास राहणाऱ्या लोकांसह १३ जणांचे नमुने झिका संसर्गाच्या चाचणीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) कडे पाठवले. शुक्रवारी महिलेच्या २२ वर्षीय मुलाचे नमुने झिका संसर्गाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

नोबल रुग्णालयाचे सीईओ काय म्हणाले?

नोबल रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. एच. के. साळे म्हणाले, 'महापालिकेने आम्हाला पत्र लिहिले असून त्यांच्या सूचनेनुसार भविष्यात आढळणारे रुग्ण आढळल्यास त्याची माहिती प्राधान्याने पालिकेला दिली जाईल. आम्ही नियमितपणे पालिकेला प्राधान्याने अधिसूचित रोगांची माहिती देतो. मात्र, डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून आम्ही तातडीने मनपाला कळवले. झिका विषाणू अधिसूचित आजारात नसल्याने प्रयोगशाळेने मनपाला माहिती दिली नसावी.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर