Pune Traffic News : पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. चौका चौकात होणाऱ्या ट्रॅफिक जॅममुळे पुणेकर वैतागले आहेत. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगर पालिकेने पुढाकार घेतला असून आता १०० दिवसांच मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत पुण्यातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शहरात ३० मिसिंग लिंक व रस्ता रुंदीकरण करून ९ बॉटल नेक काढून टाकले जाणार आहेत. या साठी शहरात १५ आदर्श रस्त्यांसोबतच उर्वरीत १७ रस्त्यांचेही डांबरीकरण, रुंदीकरण व वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या अतिक्रमांनावर बुलडोजर चालवला जाणार आहे.
पुण्यात वाहनांची संख्या वाढली आहे. तसेच शहरात विकासकामे सुरू असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पुणे पालिके तर्फे वाहतूक कोंडी होणारे रस्ते ओळखून तेथील अतिक्रमण हटवले जात आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मांडण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्राधान्याने वाहतुकी कोंडी सोडवण्याच्या सूचना केल्या होत्या. जेथे वाहतूक कोंडी होते त्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि अतिक्रमण काढून टाकण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या होत्या. वेळ पडली तर पोलिसांची मदत देखील त्यांनी घ्या अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार आता पुणे महानगर पालिकेने उपाय योजना सुरू केल्या आहेत.
पुण्यात अनेक रस्ते अर्धवट आहेत. काही रस्ते हे जोडले गेले नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाही वाहतूक कोंडी होते. यामुळे पालिकेने पुण्यातील ३० मिसिंग लिंक आणि ९ बॉटल नेक काढून टाकण्याची मोहीम हाती घेतली आहे. या साठी आवश्यक निधीसाठी राज्यशासनाला मागणी करण्यात आली आहे. या साठी ५०० कोटी रुपयांची गरज असून अद्याप हा निधी पालिकेला मिळालेला नाही. हा निधी लवकरच मिळण्याची अशा असून त्यानंतर ही कामे वेगाने मार्गी लागणार आहे.
सोलापूर रस्ता- फातिमानगर जंक्शनच्या दोन्ही बाजूस १०० मीटर लांबीचे बॉटल नेक आहेत.
नगररस्ता - वाघेश्वर मंदिर ते वस्ती संपेपर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूस रुंदीकरण करणे, खराडी जकात नाका ते खराडी आयटी पार्क ५०० मीटर.
खराडी बायपास रस्ता - मुंढवा ३ जंक्शन ते नदीपूल, मुंढवा जंक्शन ते रेल्वे उड्डाणपूल.
नॉर्थ मेन रस्ता - पासपोर्ट ऑफिस ते पुनावाला फिनकॉर्प बाजूला एस लेनसमोर डीपीतील रस्ता ताब्यात घेऊन तिथे ३०० मीटर रस्ता करणे, मुंढवा ते एबीसी जंक्शन, एबीसी चौकाजवळ कोरेगाव पार्क रस्त्यावर.
फ्रिन्स आफ वेल्स रस्ता • वानवडी बाजार चौकी, गंगाधाम ते लुल्लानगर ते पुष्पमंगल.
मंगलदास वेलेस्ली संगमवाडी ६ रस्ता मंगलदास ते मोबोज चौक ते पर्णकुटी, आरटीओ चौक.
कोंढवा रस्ता - गोळीबार चौक ते लुल्लानगर चौक.
सातारा रस्ता - पंचमी हॉटेल ते जेधे ओव्हर ब्रिजच्या सुरुवातीपर्यंत, पुष्पमंगल चौक ते पदमावती चौक, कात्रज चौक.
संबंधित बातम्या