Pune airport : पुणे विमानतळाचा विस्तार! नव्या टर्मिनलचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune airport : पुणे विमानतळाचा विस्तार! नव्या टर्मिनलचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

Pune airport : पुणे विमानतळाचा विस्तार! नव्या टर्मिनलचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

Mar 10, 2024 02:45 PM IST

pune airport new terminal : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते लोहगाव येथील पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले

पुणे विमानतळाचा विस्तार! नव्या टर्मिनलचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
पुणे विमानतळाचा विस्तार! नव्या टर्मिनलचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

pune airport new terminal : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने लोहगाव येथील पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या नव्या टर्मिनलमुळे देशातील सामान्य माणसासाठी विमान प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होईल, असे प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमाला कोल्हापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर पुणे विमानतळ येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.

Arvind kejriwal : ‘पतीने मोदींचा जयघोष केला तर रात्रीचे जेवण देऊ नका’: केजरीवालांचे महिला मतदारांना अजब आवाहन

पुणे शहराला साजेसे भव्य विमानतळ तीन वर्षात उभारणार: फडणवीस

पुणे शहराला साजेसे भव्य आणि आधुनिक, पुणे शहराच्या संस्कृतीची अनुभूती करून देणारे टर्मिनल अस्तित्वात आल्याबद्दल केंद्र सरकारचा आभारी आहे. येत्या तीन वर्षात पुण्याला स्वतंत्र विमानतळ देण्यार. पुणे हे एक महत्वाचे शहर आहे. पुणे जिल्हा महाराष्ट्राचे मॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी हब आहे. देश-विदेशातून अनेक नागरिक पुण्यात येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांना सुविधा देण्यासाठी जुने टर्मिनल अपूरे होते. संरक्षण मंत्रालयाला विनंती करण्यात येऊन नव्या इमारतीसाठी जागा उपलब्ध झाली आणि त्यामुळे भव्य टर्मिनल उभे राहिले आहे.

पुरंदर येथील विमानतळ व कार्गो सेंटरसाठी लवकरच भूसंपादन

पुणे वायुसेनेचे केंद्र असल्याने इथली धावपट्टी अनेकदा बंद ठेवावी लागते. त्यामुळे विमानसेवेच्या विस्ताराची गरज लक्षात घेता पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे. लवकरच त्यासाठीचे भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे. उद्योगांना नवी पुरवठा साखळी विकसीत करता येईल आणि रोजगाराला चालना मिळेल असे विमानतळ आणि कार्गो सेंटर पुरंदर येथे उभारण्यात येईल. पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता हे विमानतळ आवश्यक असून त्यामुळे पुण्याच्या जीडीपीमध्ये २ टक्के वाढ होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

Bhaskar Jadhav Crying : मुलाचं मनोगत ऐकून भर मंचावर भास्कर जाधव झाले भावुक, आज करणार भूमिका स्पष्ट

पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्याचा प्रयत्न-अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, एकाचवेळी १० हजार कोटी रुपये खर्चाच्या १४ विमानतळ प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. बरेच दिवसापासून पुण्याच्या नावाला साजेसे टर्मिनल व्हावे ही पुणेकरांची मागणी होती. स्व.गिरीश बापट यांनीदेखील नव्या टर्मिनल इमारतीच्या जागेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. एक हजार मोटारी उभे राहू शकतील, ३४ चेक इन काऊंटर, ९० लाख वार्षिक प्रवासी क्षमता असलेले हे टर्मिनल आहे.

Lok Sabha Election 2024: शरद पवार यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंनी देखील मुंबईतील उमेदवाराची घोषणा, संजय निरुपम आक्रमक

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा परिसरात उभारण्यात आला आहे. एप्रिलमध्ये नव्या टर्मिनलच्या सुविधा सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात नवे विमानतळ उभारण्यासोबत विद्यमान धावपट्टी वाढविण्याचा विचार करण्यात येत आहे. दूरदृष्टी असणारे प्रधानमंत्री असल्याने देशात असे आमुलाग्र बदल होत आहेत. वंदे भारत रेल्वे, नवे विमानतळ आदी बाबी पुर्णत्वास येत आहेत, असेही पवार म्हणाले.

डॉ. एच. श्रीनिवास यांनी प्रास्ताविकात पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीतील सुविधांची माहिती दिली. भारतीय विमानतळांना आधुनिक सुविधा देण्यात येत आहे. विमानतळावर स्थानिक संस्कृतीला प्रदर्शित करण्यात येत आहे. पुणे विमानतळाच्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ ५२ हजार चौ.मीटर असून सर्वाधिक व्यस्त वेळेत ३ हजार प्रवासी क्षमता आहे, अशी त्यांनी दिली.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर