पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यवतमाळमधून अनेक विकासकामांचा शुभारंभ केला. यावेळी आपल्या भाषणातून त्यांनी पुन्हा एकदा ४०० पारचा नारा देत काँग्रेस व शरद पवारांवर जोरदार हल्ला चढवला. मोदी म्हणाले की, देशाचा विकास करण्यासाठी आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा समर्पित करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बुधवारी भारी (यवतमाळ) येथे महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात बोलताना मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
काँग्रेसवर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, आमच्या आधीच्या सरकारमध्ये दिल्लीतून १ रुपया जरी निघाला तर लाभार्थ्यापर्यंत केवळ १५ पैसे पोहोचत होते. तेव्हा कृषीमंत्रीही महाराष्ट्रातले होते, मात्र शेतकऱ्यांना काही मिळाले नाही. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर तोफ डागली आहे. आज मी केवळ एक बटण दाबले आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात २१हजार कोटी इतकी मोठी रक्कम जमा झाली. हीच तर मोदींची गॅरंटी आहे. मात्र जर काँग्रेस सरकार असते तर या २१ हजार कोटींपैकी १८ हजार कोटी मधल्या मध्येच गडप झाले असते.
२०१४ आधी देशाचे कृषीमंत्री महाराष्ट्रातले होते,तेव्हा पॅकेज जाहीर व्हायचं पण शेतकऱ्यांना मिळायचं नाही. सरकारमध्ये दिल्लीतून १ रुपया जरी निघाला तर लाभार्थ्यापर्यंत केवळ १५ पैसे पोहोचत होते. मात्र आता चित्र बदलले आहे. आज मी एक बटण दाबले आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटी एवढी मोठी रक्कम पोहोचलीय. हीच तर मोदींची गॅरंटी आहे.
संबंधित बातम्या