PM Modi Visit Pune: पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पायाभरणीसह २२,६०० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण-pm modi visit to maharashtra inauguration of projects worth 22 thousand 600 crores ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PM Modi Visit Pune: पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पायाभरणीसह २२,६०० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण

PM Modi Visit Pune: पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पायाभरणीसह २२,६०० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण

Sep 26, 2024 12:43 PM IST

PM Modi Visit Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या(२६सप्टेंबर) पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ते विविध प्रकल्पांच्या पायाभरणीसह २२ हजार ६०० कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण करणार आहेत.

पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दोऱ्यावर
पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दोऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण करतील.

मोदींच्या हस्ते उद्घाटने करण्यात येणारे प्रकल्प -

  • जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाच्या उद्घाटनामुळे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. यासाठी खर्च सुमारे १ हजार ८१० कोटी रुपये आहे.
  • २,९५० कोटी रुपये खर्चून विकसित केल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो फेज-१ च्या स्वारगेट-कात्रज विस्ताराची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. यातील मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज या तीन स्थानकांसह सुमारे ५.४६ कि. मी. चा हा दक्षिणेकडील विस्तार पूर्णपणे भूमिगत आहे.
  • प्रधानमंत्री भिडेवाडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणी करतील.
  • प्रधानमंत्री तीन परम रुद्र सुपरकंप्युटर राष्ट्राला समर्पित करतील, ज्यांची किंमत सुमारे  १३०  कोटी रुपये आहे.  
  • हवामान आणि हवामान संशोधनासाठी तयार केलेल्या उच्च-कार्यक्षमता संगणकीय (एचपीसी) प्रणालीचेही प्रधानमंत्री उद्घाटन करतील. या प्रकल्पात ८५० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. 
  • प्रधानमंत्री पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील विविध उपक्रमांचा शुभारंभ करतील आणि देशाला समर्पित करतील, ज्यांची एकूण किंमत १० हजार ४०० कोटी रुपये आहे. हे उपक्रम ऊर्जा, पायाभूत सुविधा, ट्रक आणि कॅब चालकांच्या सुरक्षितता आणि सोयीसाठी, स्वच्छ गतिशीलता आणि शाश्वत भविष्य यावर केंद्रित आहेत.
  • ट्रक चालकांना सोयीचा प्रवास अनुभव मिळावा यासाठी प्रधानमंत्री छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र), फतेहगड साहिब (पंजाब), सोंगढ (गुजरात), बेळगावी आणि बेंगळुरु ग्रामीण (कर्नाटक) येथे ‘वे साइड अ‍ॅमेनिटीज’ सुरू करतील.
  • ग्रीन एनर्जी, डी-कार्बनायझेशन आणि शून्य उत्सर्जनात रूपांतर सुलभ करण्यासाठी प्रधानमंत्री ५००  इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधांचा शुभारंभ करतील. 
  • देशभरात २०  द्रवीकृत नैसर्गिक वायू (LNG) स्टेशन सुरू करण्यात येतील, ज्यामध्ये महाराष्ट्रातील ३ स्टेशनचा समावेश आहे. 
  • १ हजार ५०० ई २० (२०% इथेनॉल मिश्रित) पेट्रोल रिटेल आउटलेट्स, ज्यांची एकूण किंमत सुमारे २२५ कोटी रुपये आहे, पंतप्रधान देशाला समर्पित करतील.
  • सोलापूर विमानतळाचे उद्घाटन प्रधानमंत्री करतील, ज्यामुळे पर्यटन, व्यावसायिक प्रवासी आणि गुंतवणूकदारांसाठी सोलापूर अधिक प्रवेशयोग्य होईल. सोलापूरच्या विद्यमान टर्मिनल इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले असून ते दरवर्षी सुमारे ४.१ लाख प्रवाशांची सेवा देईल.
  • प्रधानमंत्री छत्रपती संभाजीनगरपासून २० किमी दक्षिणेला असलेल्या बिडकिन औद्योगिक क्षेत्राचे उद्घाटन करतील, हा एक परिवर्तनकारी प्रकल्प आहे, जो राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत विकसित केला आहे. 

 

Whats_app_banner
विभाग