मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Metro news : पुणे मेट्रोचा विस्तार! रामवाडी पर्यन्त सेवा सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला हिरवा कंदील

Pune Metro news : पुणे मेट्रोचा विस्तार! रामवाडी पर्यन्त सेवा सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला हिरवा कंदील

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 07, 2024 06:36 AM IST

Pune Metro news : पुणे मेट्रोचा विस्तार झाला असून आता मेट्रो ही रामवाडी पर्यन्त धावणार आहे. तसेच नव्या मार्गाचे भूमिपूजन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

पुणे मेट्रोचा विस्तार! रामवाडी पर्यन्त सेवा सुरू
पुणे मेट्रोचा विस्तार! रामवाडी पर्यन्त सेवा सुरू

PM Modi inogarate pune metro new rout : पुणे मेट्रो आता रामवाडी पर्यन्त धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रुबि हॉल ते रामवाडी सेवेचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. तर पिंपरी-चिंचवड ते निगडी मार्गाचे भूमिपूजन देखील त्यांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधानांनी कोलकता येथून विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. तर या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही सह्याद्री अतिथि गृहावरून सहभागी झाले होते.

Maharashtra Weather Update : विदर्भावर अवकाळी पावसाचे संकट कायम; ढगाळ हवामानासह गारठा वाढणार

रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग ५.५ किलोमीटरचा आहे. यापूर्वी ६ मार्च २०२२ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी या ७ किलोमीटर आणि वनाज ते गरवारे ५ किलोमीटर मेट्रो मार्गांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते. फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय ६.९१ किलोमीटर आणि गरवारे ते रुबी हॉल ४.७५ किलोमीटर टप्प्यांचे लोकार्पण देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आले होते.

रुबि ते रामवाडी मार्गासोबतच पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या पहिल्या टप्प्यातील विस्तारित ४.४ किलोमीटरचा उन्नत मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले असून या मार्गामुळे यामुळे स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड हा मार्ग आता थेट निगडीपर्यंत विस्तारला जाणार आहे.

Pune Tilak Road Crime : धक्कादायक! मैत्रिणीला मॉडलिंगला नेल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

रुबी हॉल क्लिनिक स्थानक ते रामवाडी स्थानक या मार्गाचे उदघाटन झाल्यामुळे आता मेट्रो वनाझ ते रामवाडी पर्यन्त धावणार आहे. यामुळे पुर्व पुणे व पश्चिम पुणे मेट्रोच्या सहाय्याने जोडले गेले आहे. या मार्गिकेमुळे विमान नगर, येरवडा, कल्याणी नगर, चंदन नगर, शास्त्रीनगर, खराडी, वडगाव शेरी , तळेगाव, या भागातील नागरिकांना फायदा होणार आहे. या मार्गिकेमुळे वनाझ ते रामवाडी असा १४.५ किमी चा प्रवास अवघ्या ३६ मिनिटात करणे शक्य होणार आहे. तसेच प्रवासी भाडे ३० रुपये असणार आहे. त्याचबरोबर या रामवाडी स्थानकाच्या परिसरात असणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांना प्रवास करणे सुलभ होणार आहे.

Pune kondhwa Crime : पुण्यात खोट्या लष्करभरतीचे रॅकेट उघड; लष्करात नोकरीच्या आमिषाने फसवणारा गजाआड

आज भूमिपूजन झालेल्या चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक ते निगडी (४.४ किमी उन्नत मार्ग) या नवीन मार्गिकेवर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी अशी तीन स्थानके आहे. या मार्गिकेमुळे भक्ती शक्ती चौक ते स्वारगेट असा थेट प्रवास करणे शक्य होणार आहे. या मार्गिकेमुळे पुणे व पिंपरी चिंचवड हि जुळी शहरे पूर्णपणे जोडली जाणार आहेत. या मार्गीच्या जवळ असणाऱ्या निवासी भाग, शैक्षणिक संस्था, औद्योगिक भाग येथील कर्मचारी आणि रहिवासी यांना मेट्रोचा फायदा होणार आहे. चिंचवड रेल्वे स्थानक आणि आकुर्डी बस डेपो यांच्याबरोबर एकीकरण केल्यामुळे येथील प्रवाशांना  फायदा होईल.

IPL_Entry_Point