PM Modi to visit Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (शुक्रवार) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. नाशिक व मुंबईत पंतप्रधानांच्या हस्ते अनेक विकासकामांचे उद्घघाटन करण्यात येणार आहे. आपल्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचे लोकार्पण, खारकोपर -उरण रेल्वे सेवा व नाशिकमधील युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत.
मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच नाशिक व मुंबईतील वाहतूक देखील अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.
मोदींचे दुपारी सव्वा बारा वाजता नाशिकमध्ये आगमन होणार आहे. त्यांच्या हस्ते २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. दुपारी साडेतीनच्या सुमाराला मुंबईत अटल सेतूचे लोकार्पण व चार वाजता नवी मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.