NDA govt first decision : नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा पहिला निर्णय; पीएम किसान योजनेच्या १७ व्या हफ्त्याला मंजुरी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  NDA govt first decision : नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा पहिला निर्णय; पीएम किसान योजनेच्या १७ व्या हफ्त्याला मंजुरी

NDA govt first decision : नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा पहिला निर्णय; पीएम किसान योजनेच्या १७ व्या हफ्त्याला मंजुरी

Jun 10, 2024 02:32 PM IST

PM Kisan Nidhi Yojana : रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर मोदी यांनी पीएम किसान निधीच्या संबंधित फाइलवर पहिली स्वाक्षरी केली.

रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर मोदी यांनी पीएम किसान निधीच्या संबंधित फाइलवर पहिली स्वाक्षरी केली.
रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर मोदी यांनी पीएम किसान निधीच्या संबंधित फाइलवर पहिली स्वाक्षरी केली. (HT_PRINT)

PM Kisan Nidhi Yojana : नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आज त्यांनी पंतप्रधान पदाचा पदाभार स्वीकारला आहे. आज त्यांनी पंतप्रधान म्हणून पहिली सही शेतकऱ्यांसाठी केली आहे. मोदी यांनी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये जमा होणार आहेत.

Pune Black magic crime news : कोंढव्यात किरकोळ वादातून सोसायटीच्या सेक्रेटरीने घेतला काळ्या जादूचा आधार; गुन्हा दाखल

दरम्यान फाइलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आपले सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. मोदी म्हणाले, "आमचे सरकार शेतकरी कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यावर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे. भविष्यात आम्हाला शेतकरी व कृषी क्षेत्रासाठी मोठे काम करायचे आहेत.

Nashik news: नाशिक हळहळले! भावपूर्ण श्रद्धांजली असं स्टेटस ठेवत जिवलग मित्रांची एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी

रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल पीएम किसान फंडच्या निधी संबंधित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान निधीचा १७ वा हप्ता मंजूर केला असून या फाइलवर आज स्वाक्षरी केली. या निर्णयाचा देशातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यासाठी सुमारे २० हजार कोटी रुपयांचे वितरण केले जाणार आहे.

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी सकाळी कार्यालयात पोहोचून पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत मंत्रिपरिषदेच्या ७१ सदस्यांनीही शपथ घेतली.

Murlidhar Mohol : लाल मातीतला कसलेला पैलवान ते थेट केंद्रीय मंत्री; पुणेकर मुरलीधर मोहोळ यांचा झंझावाती प्रवास

१ डिसेंबर २०१८ रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना शासनाकडून दरवर्षी ६००० रुपयांची रक्कम दिली जाते. प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. जी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते. सुरुवातीला या योजनेंतर्गत केवळ २ हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळत होता, परंतु आता देशातील सर्व शेतकरी पंतप्रधान सन्मान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

किसान सन्मान निधीचे आतापर्यंत १६ हप्ते जारी करण्यात आले आहेत. १६ वा हप्ता पीम मोदी यांनी यावर्षी २९ फेब्रुवारी रोजी ९.९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला. पीएम-किसानचा १६ वा हप्ता मिळालेल्या ९.०९ कोटी शेतकऱ्यांपैकी सर्वाधिक २.०३ कोटी शेतकरी उत्तर प्रदेशातील आहेत, त्यानंतर महाराष्ट्र (८९.६६ लाख), मध्य प्रदेश (७९.३९ लाख), बिहार (७५.७९ लाख) आणि राजस्थान (७५.७९ लाख) आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाची सोमवारी सायंकाळी ५ वाजता पहिली बैठक होणार आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर