Narendra Modi : "...तर तुम्हाला रुग्णालयात जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Narendra Modi : "...तर तुम्हाला रुग्णालयात जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला

Narendra Modi : "...तर तुम्हाला रुग्णालयात जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला

Nov 14, 2024 10:49 PM IST

PM Modi Mumbai Rally : तुम्ही राहुल गांधींकडून बाळासाहेब ठाकरेंना हिंदूहृदयसम्राट वदवून घ्या, तुम्हाला चांगली झोप येईल व रुग्णालयात जायची गरज राहणार नाही, असा टोला पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंना लगावला.

पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज मुंबईत शेवटची सभा पार पडली. यावेळी मोदींनी राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार असून सभेतील लोकांना शपथविधी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. यावेळी मोदींनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणले की, तुम्ही राहुल गांधींकडूनबाळासाहेब ठाकरेंना हिंदूहृदयसम्राट वदवून घ्या, तुम्हाला चांगली झोप येईल व रुग्णालयात जायची गरज राहणार नाही,  असा टोला पंतप्रधान मोदींनीलगावला.

मोदींनी विधानसभा निवडणुकीच्या याआधीच्या प्रचारसभांमध्येही काँग्रेसमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे कौतुक करण्याचे धाडस आहे का, असा सवालकेला होता.काँग्रेसला आणि त्यांच्या युवराजांनी बाळासाहेब ठाकरेंचे त्यांच्या विचारधारेचे सार्वजनिकरित्या कौतुक करुन दाखवावे, असं आव्हान मोदींनी दिलं होतं.आज मुंबईतल्या शिवतीर्थावरील सभेतही मोदींनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

महाराष्ट्रातील आपल्या अखरेच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा भाजपा महायुती आहे तर गती आहे. महाराष्ट्राची प्रगती असल्याचा नारा दिला. मोदी म्हणाले, मुंबई बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वांचे शहर आहे. स्वाभिमानाचं शहर आहे. पण महाआघाडीत एक असा पक्ष आहे ज्यांनी बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात आपला रिमोट कंट्रोल दिला आहे. त्यामुळे मी यांना आव्हान दिलं होतं की काँग्रेसच्या तोंडातून, राहुल गांधींच्या तोंडून बाळासाहेबांचे कौतुक करणारे काही शब्द बोलून दाखवावे. राहुल गांधींनी तोंडातून एकदा तरी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  असं बोलून दाखवावं. एवढं जरी केलं तरी तुम्हाला चांगली झोप लागेल आणि दवाखान्यात जाण्याची गरज लागणार नाही. बाळासाहेबांचे आशीर्वाद मिळतील. आजपर्यंत हे लोक काँग्रेस कडून राहुल गांधींकडून बाळासाहेबांचे कौतुक करून घेऊ शकले नाहीत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

मोदी म्हणाले महाराष्ट्रात एकीकडे महायुतीची विचारधारा आहे, दुसरीकडे महाविकास आघाडीचे विचार आहेत, जे महाराष्ट्राचा अपमान करते. महाविकास आघाडीचे लोक तुष्टीकरणाचे गुलाम झालेत. ते राममंदिराचा विरोध करतात. मतांसाठी भगवा आतंकवाद असा शब्द वापरतात. ही जी आघाडी आहे,ते नेहमी वीर सावरकरांचा अवमान करते. काश्मीरमध्ये कलम ३७० च्या पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर करते.

देशातील काश्मीरमध्ये संविधान चालत नव्हतं. तिथे कायदा वेगळा होता. ध्वज वेगळा होता. आता तिथे काँग्रेस हे बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान करत होता. पण ३७० गाडून टाकलं. जम्मू काश्मिरच्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा संविधानाची शपथ घेतली.

Whats_app_banner