पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिकमध्ये २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात मोदींनी तरुणपिढीला मार्गदर्शन केले. मोदी म्हणाले की, माझा सर्वात जास्त विश्वास भारताच्या युवा पिढीवर आहे. स्थानिक उत्पादनाला चालना द्या, मेड इन उत्पादनाला प्राधान्य द्या. कुठल्याही ड्रग्सच्या आहारी जाऊ नका. तुमच्या जीवनापासून ते दूर ठेवा. आई बहिणींवरून अपशब्द, शिवीगाळ देण्याची प्रथा असेल त्याविरोधात आवाज उचला. ते बंद करा.
मोदी म्हणाले की, भारत लोकशाहीची जननी असून यात तरुणांचं मोठं योगदान आहे. देशातील तरुण तरुणींनी यापुढेही लोकशाही मजबूत करण्याचं काम केलं पाहिजे. घराणेशाहीच्या राजकारणाने देशाचं मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे घराणेशाहीला लोकशाही प्रक्रियेपासून दूर ठेवलं पाहिजे. या प्रक्रियेत तरुणांचा जेवढा सहभाग जास्त असले तितकं देशाचं भविष्य उज्ज्वल असेल. देशाचं भविष्य असलेल्या या तरुण पिढीने येणाऱ्या काळात ही जबाबदारी स्वीकारावी.
आपल्या देशातील प्रत्येक युवा त्यांची जबाबदारी निष्ठेने आणि सामर्थ्याने पूर्ण करेल हा विश्वास आहे. सशक्त भारताची जी ज्योत आम्ही पेटवली आहे ती अमृतकाळात अमरज्योत बनवा असे आवाहन मोदींनी केले आहे.