मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PM Modi Nashik Visit: नाशकात पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो, पाहा व्हिडिओ

PM Modi Nashik Visit: नाशकात पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो, पाहा व्हिडिओ

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 12, 2024 02:56 PM IST

PM Modi Maharashtra Visit: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

नाशकात पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो, पाहा व्हिडिओ
नाशकात पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो, पाहा व्हिडिओ

Narendra Modi Road Show In Nashik: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. महाराष्ट्र दौऱ्यात त्यांनी सर्वप्रथम नाशिकमध्ये रोड शो केला. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. रोड शोनंतर पंतप्रधान मोदींनी गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या रामकुंडावर प्रार्थना केली. यानंतर त्यांनी श्री काळाराम मंदिर गाठून येथेही पूजा केली. पंतप्रधान मोदींनी येथे वाद्य मंजिरा देखील वाजवले. त्यानंतर पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

देशभरातून या महोत्सवासाठी तरुण तरुणांनी गर्दी केलेली आहे. या सगळ्यांची सध्या चेकिंग सुरू आहे. एकेक करून पोलीस या सगळ्यांना आज सोडत आहेत. तर, दुसरीकडे १५ फुटांचा भव्य दिव्य असा व्यासपीठ उभारण्यात आलेला आहे, जवळपास डझनभर मंत्री केंद्रीय आणि राज्यातले मंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

Ahmadnagar: पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्याआधी शेतकरी नेत्यांची धरपकड!

दरम्यान,संपूर्ण व्यासपीठाला फुलांची आरस करण्यात आवी. तसेच भव्य दिव्य एलईडी स्क्रीन लावण्यात आली. याचबरोबर डॉल्बी स्पीकर लावून या ठिकाणी २० हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था एका पँडॉलमध्ये करण्यात आली.

 

WhatsApp channel