PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर! मुंबई मेट्रोसह पोहरादेवी येथे विविध प्रकल्पाचे उद्घाटन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर! मुंबई मेट्रोसह पोहरादेवी येथे विविध प्रकल्पाचे उद्घाटन

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर! मुंबई मेट्रोसह पोहरादेवी येथे विविध प्रकल्पाचे उद्घाटन

Published Oct 05, 2024 07:53 AM IST

PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. आज ते मुंबई मेट्रोसह वाशिम येथील पोहोरादेवी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर! मुंबई मेट्रोसह पोहरादेवी येथे विविध प्रकल्पाचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर! मुंबई मेट्रोसह पोहरादेवी येथे विविध प्रकल्पाचे उद्घाटन

PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांच्या हस्ते आज विविध विकास कामांचे उद्घाटन होणार आहे तर अनेक प्रकल्पांची पायाभरणी ते करणार आहेत. मोदी यांची हस्ते आज मुंबई मेट्रोच्या भूमिगत मार्गीकेचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर मोदी हे वाशिम जिल्ह्यातील पोहोरादेवी येथे जाणार आहे. या ठिकाणी ते जगदंबा मातेचे दर्शन घेतल्यानंतर संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज यांच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण करून नंगारा भवनाचे लोकार्पण करणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

वाशिम जिल्ह्यातील पोहोरादेवी येथे होणार असलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबुसिंग महाराज, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आदी नेते उपस्थित राहणार आहेत.

असा असणार मोदी यांचा दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी ११.१५ वाजता पोहरादेवी येथे पोहोचणार आहेत. त्यानंतर ते येथील जगदंबा मातेचे दर्शन घेऊन त्यानंतर संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज यांच्या समाधीवर जात श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. यानंतर मोदी यांच्या हस्ते नंगारा भवनाचे लोकार्पण केले जाणार आहे. दुपारी १२ वाजता २३ हजार ३०० कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्राशी सबंधित कार्यक्रमाचा शुभारंभ मोदी यांच्या हस्ते केला जाणार आहे.

पीएम किसान सन्मान निधीच्या १८ हप्ताचे वितरण

पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशभरातील ९.४ कोटी शेतकऱ्यांना २० हजार कोटी रुपयांचा पीएम किसान सन्मान निधीचा १८ हप्ता वितरीत केला जाणार आहे. या सोबतच शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पाचव्या हप्त्याच्या २ हजार कोटी रुपयांचे वितरणही मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. तर १,३०० कोटी रुपयांची एकत्रित उलाढाल असलेल्या ९,२०० शेतकरी उत्पादक संघटना, पंतप्रधान कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत १,९२० कोटी रुपयांचे ७,५०० प्रकल्याचे लोकार्पण देखील मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे.

या प्रकल्पांचे लोकार्पण

मोदी यांच्या हस्ते कोल्ड स्टोअरेज प्रकल्प, गोदामे, प्राथमिक प्रक्रिया युनिट या प्रकल्पांचे लोकार्पण केले जाणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात १९ मेगावॅट क्षमतेचे पाच सौर उर्जा पार्कचे देखील पीएम मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मानही मोदी यांच्या हस्ते केला जाणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर