Pune metro : पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्गाचे पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आलं. आजपासून ही भूमिगत मेट्रो सुरु होणार आहे. नागरिकांनी आवर्जून हा मेट्रो प्रवास करावा असे मेट्रो प्रशासनाने आवाहन केले आहे. या उद्घाटनाप्रसंगी मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. मोदी म्हणाले, जुन्या सरकराची कार्यपद्धती देशाला मागे घेऊन जाणारी होती. ती कार्यपद्धती आम्ही बदलून देशाला वेगाने पुढे घेऊन जात आहोत.
गणेश कला क्रीडा मंदिरात दूरदृश्य प्रणालीमार्फत पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे लोकार्पण कात्रज ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन तसेच भिडे वाड्यातील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने मोदींच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. या मेट्रोमधून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी प्रवास केला. ही मेट्रो मार्गिका दुपारी ४ वाजल्यानंतर सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.
पंत प्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महिलांचा विकासाठी वेगवेगळेया प्रकारे प्रयत्न आम्ही करत आहोत. विकासासोबत या शहराचा वारसा देखील आम्ही जप्त असून त्यातून सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आज आम्ही केले आहे. पुणे ज्या गतीने पुढे जात आहे, त्याच गतीने येथील सुविधा देखील वाढवत आहोत. हा विकास आधीच व्हायला हवा होता. मात्र, तस झालं नाही. या पूर्वी कोणत्याही कामाची अंमलबजावणी केली जात नव्हती. अनेक विकास कामांच्या फाइल या पडून राहत होत्या. २००८ साली मेट्रोची चर्चा सुरु होती पण आमच्या सरकारच्या काळात पुण्याची मेट्रो प्रत्यक्ष धावली. या पूर्वीच्या सरकारने मेट्रोचा साधा एक पिलर देखील उभारला नाही. महाराष्ट्र हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार चांगल काम करत असल्याचं देखील ते म्हणाले.
पुणे मेट्रोच्या टप्पा १ ज्यामध्ये पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनझ ते रामवाडी या दोन मार्गिका आहेत. यापैकी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या अंतिम भूमिगत मार्गाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या मार्गिकेमुळे पुण्यातील दाट लोकवस्ती असणारा कसबा पेठ, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट हा भाग मेट्रो मार्गीकेने जोडला जाणार आहे. मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर दुपारी ४ वाजता या मार्गावर प्रवासी सेवा सुरू केली जाणार आहे. त्यानंतर थेट पीसीएमसी ते स्वारगेट हा प्रवास या मार्गावर करणे पुणेकरांना शक्य होणार आहे. पीसीएमसी ते स्वारगेट या प्रवासासाठी ३४ मिनिटे वेळ जाणार असून त्यासाठी ३५ रुपये भाडे असणार आहे. वनाझ ते रामवाडी या मार्गावरील प्रवासी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक येथे इंटरचेंज करून स्वारगेट किंवा पीसीएमसी या दिशेने प्रवास करू शकतात.
या मार्गावकर जिल्हा न्यायालय ते कसबा पेठ स्थानकासाठी १० रुपये भाडं राहणार आहे. तर जिल्हा न्यायालय ते मंडई साठी १५ रुपये भाडे आकरले जाणार आहे. तर जिल्हा न्यायालय ते स्वारगेट १५ रुपये दर अकरले जाणार आहे. स्वारगेट ते मंडई १० रुपये, स्वारगेट ते कसबा पेठ १५ रुपये, तर स्वारगेट ते जिल्हा न्यायालय १५ रुपये भाडे आकारले जाणार आहे.