विधानसभा निवडणूक व मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच येत्या १५ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधून त्यांना कानमंत्र देणार आहेत. नौसेनेच्या दोन युद्धनौका आणि एका पाणबुडीचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्तेबुधवारी (१५ जानेवारी) होणार आहे.या सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार असून आमदारांसोबत स्नेहभोजनहीकरणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येणार असून राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात महायुतीच्या आमदारांना आगामी निवडणुकांसाठी मोदी कोणता कानमंत्र देतात हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले तर दुसरीकडे महायुतीची पुरती वाताहत झाली. त्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले होते. विधानसबा विजयानंतर मोदी सरकारच्या शपथविधी कार्यक्रमासाठी मुंबईत आले मात्र नियोजित कार्यक्रमांमुळे त्यांना महायुतीच्या आमदारांना भेटता आले नव्हते. बुधवारी भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदे सेनेचेच आमदार पंतप्रधान भेटणार असून त्यांच्यासोबत डिनरही करणार आहेत.
मुंबईच्या नेव्ही डॅाकयार्डच्या कॅंम्पसमध्ये मुख्यमंत्री,राज्याचे मंत्रिमंडळ आणि महायुतीच्या आमदारांसोबत पीएम मोदींच स्हेहभोजन पार पडणार आहे.यावेळी भाजपचे पदाधिकारीही पंतप्रधान मोदींसोबत स्नेहभोजन घेणार आहेत. महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व आमदार आणि मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
पंतप्रधान मोदी बुधवार १५ जानेवारीला सकाळी १०.३० वाजता मुंबईत दाखल होतील. त्यांच्या हस्ते नौदल डॉकयार्ड येथे INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर या तीन युद्धनौकांचे लोकार्पण केले जाणार आहे. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करतील.
नवी मुंबईतील खारघर येथे तब्बल ९ एकरात पसरलेल्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिर या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन मोदी करणार आहेत. या मंदिर परिसरात अन्य अनेक देवी- देवतांची मंदिरे, वैदिक शिक्षण केंद्र, संग्रहालय, सभागृह आणि उपचार केंद्र निर्माण केले आहे. वैदिक शिकवणींद्वारे वैश्विक बंधुता, शांतता आणि सौदार्हतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रकल्प तयार करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या