मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवडमधील कुडाळ वाडी परिसरातील भंगाराच्या गोदामात स्फोट, आठ जण जखमी

Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवडमधील कुडाळ वाडी परिसरातील भंगाराच्या गोदामात स्फोट, आठ जण जखमी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 18, 2024 06:05 AM IST

Pimpri-Chinchwad scrap godown explosion: पिंपरी-चिंचवडमधील कुडाळ वाडी परिसरातील भंगाराच्या गोदामात स्फोट झाल्याने आठ कर्मचारी जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

Representative Image
Representative Image

Pimpri-Chinchwad Kudal Wadi explosion: पिंपरी-चिंचवडमधील कुडाळ वाडी परिसरातील एका भंगाराच्या गोदामात शुक्रवारी रात्री (१८ फेब्रुवारी २०२४) स्फोट झाला. या स्फोटात ८ कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमधील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. केमिकलने भरलेल्या बॅरलची साफसफाई करताना हा स्फोट झाला आणि त्यामुळे मोठी आग लागली, अशी माहिती समोर येत आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरातील मोशी संकुलात असलेल्या भंगाराच्या गोदामातील केमिकलचे बॅरल साफ करताना आग लागली. ही भीषण आग २ तास सुरू होती. यादरम्यान रसायनांच्या अनेक बॅरलचा स्फोट झाला. या आगीत आठ जण जखमी झाले असून त्यापैकी २ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र व चिखली उपकेंद्राचे प्रत्येकी एक पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले, जे एका रद्दीच्या गोदामात राहत होते. गोदामात आग प्रतिबंधक यंत्रणा नसल्यामुळे ही आग लागल्याचेही सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुसा मोहम्मद (वय, ६५), शिवराज बोईगवाड (वय, ३७), महादू पाडुळे (वय, ४५), सुरेश बोईगवाड (वय, २६), पिराज बोईगवाड (वय, २६), मल्लू बोगवाड (वय, २६), माधव बोईगवाड (वय 28) आणि बालाजी बोईगवाड (वय ३८) अशी या स्फोटात जखमी झालेल्यांची नावे आहेत. नेमका स्फोट कशामुळे झाला? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग