मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dehu Crime : धक्कादायक! पत्नी शरीर संबंध ठेऊ देत नसल्याने पतीने ओढणीने गळा आवळून पत्नीचा केला खून, देहू येथील घटना

Dehu Crime : धक्कादायक! पत्नी शरीर संबंध ठेऊ देत नसल्याने पतीने ओढणीने गळा आवळून पत्नीचा केला खून, देहू येथील घटना

Jun 23, 2024 07:11 AM IST

Pimpri-chinchwad Dehu woman murder : पुण्यातील देहू येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नी शरीर संबंध ठेऊ देत नसल्याने संतापलेल्या नवऱ्याने पत्नीची ओढणीच्या साह्याने गळा आवळून हत्या केली.

धक्कादायक! पत्नी शरीर संबंध ठेऊ देत नसल्याने पतीने ओढणीने गळा आवळून पत्नीचा केला खून. पुण्यातील देहू येथील घटना
धक्कादायक! पत्नी शरीर संबंध ठेऊ देत नसल्याने पतीने ओढणीने गळा आवळून पत्नीचा केला खून. पुण्यातील देहू येथील घटना

Pimpri-chinchwad Dehu woman murder : पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. किरकोळ कारणावरून खून, दरोडा या घटना देखील वाढल्या आहेत. पुण्यात देहू येथे एक पत्नी शरीर संबंध ठेऊ देत नसल्याच्या कारणावरून व तिचे विवाह बाह्य संबंध असल्याच्या संशयातून संतापलेल्या पतीने पत्नीला देहू येथील घाटावर फिरायला नेत तिची ओढणीच्या साह्याने गळा आवळून  हत्या केली. विशेष म्हणजे दोघांचा संसार सुरू होऊन केवळ दोन महीने झाले होते. या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना देहूगाव येथील गाथा मंदिर मागील आनंद डोह घाट परिसरात गुरुवारी (दि. २०) संध्याकाळी ९ च्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune leopard attack : पुणे जिल्ह्यात मानव-बिबट्या संघर्ष वाढला; शिरुर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा ठार

प्रतीक्षा जयदीप यादव (वय २१), असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर जयदीप अर्जुन यादव (वय २९, रा. देहूगाव, मूळ रा. चिखलगोळ, जि. सांगली) असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार किरण राजाभाऊ पाटील यांनी शुक्रवारी (दि. २१) देहूरोड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

या घटनेचे वृत्त असे की, कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील सलून व्यावसायिक भीमराव कोरे यांची मुलगी प्रतीक्षा व जयदीप यादव यांचा दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. प्रतीक्षा हिचे शिक्षण एमएसस्सीपर्यंत तर जयदीप याने अभियांत्रिकी शाखेतील पदवि घेतली आहे. जयदीप हा एका खासगी कंपनीत नोकरीला असून ते सात दिवसांपूर्वी देहूगाव येथे राहण्यासाठी आले होते.

सुरुवातीला दोघांचेही चांगले चालले होते. मात्र, काही दिवसांनी प्रतीक्षा ही जयदीपला शारीरिक संबंध ठेवू देत नव्हती. यामुळे जयदीपला तिच्यावर संशय येत होता. तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा देखील संशय त्याला होता. याच संशयातून त्याने प्रतीक्षाला गुरुवारी सायंकाळी देहूगाव येथील आनंद डोह घाट परिसरात फिरायला नेले. या ठिकाणी त्याने तिला शरीर संबंध का ठेऊ देत नाही या बाबत जाब विचारला.

मात्र, दोघांत भांडण झाल्याने संतापलेल्या जयदीपने तिचा तिथेच गळा आवळून खून केला. तर या प्रकरणी पुरावा नको म्हणून त्याने त्याचा मोबाइल हा इंद्रायणी नदीत फेकून दिला. दरम्यान, देहू येथील घाटावर महिलेचा मृतदेह सापडल्याने तातडीने पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी काही वेळातच आरोपी जयदीपला अटक केली. तसेच प्रतीक्षाचा मृतदेह हा पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

 

WhatsApp channel
विभाग