मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Fire News : पुण्यात पाच ठिकाणी आगीच्या घटना; पिंपरी-चिंचवडमध्ये पोटमाळ्यावर झोपलेल्या दोन भावांचा होरपळून मृत्यू

Pune Fire News : पुण्यात पाच ठिकाणी आगीच्या घटना; पिंपरी-चिंचवडमध्ये पोटमाळ्यावर झोपलेल्या दोन भावांचा होरपळून मृत्यू

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 23, 2024 11:29 AM IST

Two dead in fire at Pune pimpri chinchwad fire : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळं पुण्यात चार ते पाच ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. पिंपरी-चिंचवड येथे दोघांचा मृत्यू झाला.

Two dead in fire at Pune pimpri chinchwad fire
Two dead in fire at Pune pimpri chinchwad fire

Two dead in fire at Pune pimpri chinchwad fire : पुण्यात काल रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. भाविकांनी दिव्यांची आरास, फटाके फोडून आपला उत्साह आनंद साजरा केला, मात्र, या उत्साहात अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या. तब्बल चार ते पाच ठिकाणी आगी लागल्या. तर पिंपरी चिंचवड इथे वाल्हेकर वाडी येथे रात्री अडीचच्या सुमारास एका लाकडाच्या गोदामाला व दुकानाला लागलेल्या आगीत पोटमाळ्यावर झोपलेला दोन भावांचा होरपळून मृत्यू झाला. 

Manoj jarange : जालना, बीड, नगर ओलांडून मनोज जरांगे पाटलांसह मराठा वादळ पुण्यात धडकले! आज मुक्काम

गणेश पॅकेजिंग इंडस्ट्रीज ( लाकडाची वखार), मे.विनायक ॲल्युमिनियम प्रोफाइल डोअर मेकिंग कंपनी या दुकांना आग लागली. यात ललित अर्जुन चौधरी (वय २१), कमलेश अर्जुन चौधरी (वय २३) या भावांचा झोपेतच गुदमरून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच प्राधिकरणचे१ फायर टेंडर वाहन, चिखली येथील १ फायर टेंडर वाहन, पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र येथील २ फायर टेंडर वाहन तर थेरगाव१ फायर टेंडर वाहन घटनास्थळी दाखल झाले. वाल्हेकरवाडी येथील पत्राच्या शेडच्या रांगेमधील दोन शेडला आग लागली होती. तर दोन्ही गोडाऊन पूर्णपणे पेटलेले होते. गोडाऊन मध्ये लाकडाची वखार आणि हँड सो मशीन्सला, एअर कॉम्प्रेसर, अन्य ज्वलनशील साहित्य व उपकरणे असल्याने आग वेगाने पसरली. ही आग बाजूला असणाऱ्या गोडाऊन मध्ये देखील पोहचली. येथे अल्युमिनियमच्या फ्रेम व दोन टू व्हीलर तसेच दोन व्यक्ती आगीच्या धुरामुळे झोपेतच पोटमाळ्यावर झोपलेल्या दोघांचा मृत्यू झाला.

Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचे दरवाजे आजपासून सर्वांसाठी खुले! अशा प्रकारे घेता येईल रामलल्लाचे दर्शन

अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर पाणी मारून आग पूर्णपणे विझविली. गोदामाच्या बाजूला असलेल्या निवासी इमारतीमधील सर्व रहिवासांना पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. आगीचे कारण आगीचे कारण समजू शकले नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ०४ अग्निशमन केंद्रातील एकूण ५ अग्निशमन वाहनांसह जवळपास ३५ ते ४० अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

पुण्यात मॉडर्न डेअरीच्या छतावर भीषण आग

पुणे शहरातील सेंट्रल स्ट्रीट, श्रीकृष्ण तरुण मंडळ चौकात मॉडर्न डेअरीच्या छतावर मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली. ही डेअरी दुमजली असून त्यावरील टेरेसवर लोखंडी स्ट्रक्चर व पञा शेड टाकण्यात आले होते. आगीने मोठा पेट घेतल्याने छतावरील सर्व साहित्य जळून खाक झाले. आग लागल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पुणे अग्निशमन दल कोंढवा, नायडू, गंगाधाम येथील फायरगाड्या व दोन वॉटर टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आले. घटनास्थळी जवानांनी चार ही बाजूने पाण्याचा मारा करत सुमारे वीस मिनिटात आग आटोक्यात आणत धोका दूर केला.

सोमवारी दुपारी पुण्यातील कुमठेकर रस्ता येथे एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेत आग लागली. या आगीत घरगुती साहित्य जळून खाक झाले. आगीच कारण समजू शकले नाही.

दुसऱ्या घटनेत कसबा पेठ, तांबट हौद येथील एका वाड्यात घरामध्ये आग लागली. सदनिकेतील आग जवानांनी विझवत धोका दूर केला. तसेच स्थानिकांनी वेळेत आग आटोक्यात आणली म्हणून धोका टळला.

तर आज सकाळी ८.३० वाजता कोरेगांव पार्क येथील लेन नं ७ येथे असळलेय एका हॉटेलमधे आगीची घटना घडली. अग्निशमन दलाकडून ३ वाहने दाखल असून आग नियंत्रणात आणली आहे. या घटनेत कुणी जखमी अथवा मृत्यूमुखी पडलेला नाही.

WhatsApp channel