मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pimpri-Chinchwad cloud bust : चिंचवड परिसरत ढगफूटी! स्पाईन व लिंकरोड परिसरात एका तासात १४४ मिमी पाऊस

Pimpri-Chinchwad cloud bust : चिंचवड परिसरत ढगफूटी! स्पाईन व लिंकरोड परिसरात एका तासात १४४ मिमी पाऊस

Jun 24, 2024 05:29 AM IST

Pimpri-Chinchwad cloud bust : पुण्यातील पिंपरी येथे आज संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. तासभर झालेल्या या पावसामुळे पिंपरी-चिंचवड करांची त्रेधा उडाली. हवामान विभाने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी ढगफूटी सदृश पाऊस झाला. तासाभरात ११४ मिमी पावसाची नोंद झाली.

चिंचवड परिसरत ढगफूटी! स्पाईन व लिंकरोड परिसरात एका तासात १४४ मिमी पाऊस
चिंचवड परिसरत ढगफूटी! स्पाईन व लिंकरोड परिसरात एका तासात १४४ मिमी पाऊस

Pimpri-Chinchwad cloud bust : पुण्यातील पिंपरी येथे रविवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. तासभर झालेल्या या पावसामुळे पिंपरी-चिंचवड करांची त्रेधा उडाली. हवामान विभाने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी ढगफूटी सदृश पाऊस झाला. तासाभरात ११४ मिमी पावसाची नोंद झाली. अचानक आलेल्या पावसामुळे स्पाईन रोड आणि लिंकरोड परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. काही ठिकाणी तर गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

ट्रेंडिंग न्यूज

शहरातील काही भागांमध्ये ११४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दुपारी अचानक मुसळधार पावसाने शहरातील काही भागांमध्ये हजेरी लावली. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. अखेर ढगांच्या गडगडाटासह दुपारी जोरदार पाऊस बरसला. पिंपरी- चिंचवडमध्ये अवघ्या एका तासामध्ये ११४ मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे.

पुण्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. सकाळ पासून पुण्यात ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी ऊन पडले होते. संध्याकाळी ४ च्या सुमारास पुण्यात ढग भरून आले होते. पुण्यात काही परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पिंपरी- चिंचवड परिसरात काही ठिकाणी ४ ते ५ च्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, चिखली व मोशी परीसराला चांगलेच झोडपले.

एका तासात तब्बल ११४ मिमी पावसाची नोंद

पिंपरीत संध्याकाळी झालेल्या पावसामुळे अनेकांची धांदल उडाली. हवामान विभागाने तब्बल ११४ मिमी पावसाची नोंद झाली. जर एका तासांत १०० मीमी पाऊस झाला तर तो ढगफूटी सदृश्य मानला जातो. या पावसामुळे अनेक गाड्या या पाण्याखाली गेल्या होत्या. तर सखल भागातील घरात पाणी साचल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले.

सोमवारी देखील पावसाची शक्यता

पुण्यात आणि परिसरात आज सोमवारी देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सकाळी आणि दुपारी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तर संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर घाट विभागायत्त अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

WhatsApp channel