Pune Navi sangvi murder : पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील नवी सांगवी येथे पोलिस ठाण्याच्या जवळ एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री १० च्या सुमारास घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी एका तरूणावर गोळीबार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ठार झालेला तरुण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांचावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपींनी त्याच्या चेहेऱ्यावरगोळीबार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक कदम असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. घटना झाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी सांगवी येथील शंकराच्या पुतळ्यापासून काही अंतरावर ही घटना घडली. आरोपी कदम हा येथे असतांना दोघे जण दुचाकीवरून आले. त्यांनी दीपक कदम याच्यावर जवळून तीन गोळ्या झाडल्या. त्या त्याच्या चेहऱ्याला लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे सांगवीसह पिंपळे गुरव परिसरात दहशतीचे वातावरण आहे. गोळीबार कुणी केला ? का केला हे प्रश्न अनुत्तरित आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथकांची स्थापना केली आहे. तसेच आरोपीचा शोध घेतला जात आहे. ही घटना पूर्व वैमनस्यातुन झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भुसावळ शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. बुधवारी रात्री, काही अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत धावत्या गाडीवर गोळीबार करून येथील माजी नगरसेवक व आणखी एका व्यक्तीची हत्या केली. ही घटना रात्री १० च्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माजी नगरसेवक संतोष बारसे व संतोष राखुंडे अशी हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत