Wakad Pune Crime News : पुण्यातीतील पिंपरी-चिंचवड येथील वाकड परिसरात लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा तिच्या प्रियकराने खून केला आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने महिलेचा मृतदेह हा खंबाटकी घाटात फेकून दिला. ही महिला त्याला सतत पैशांची मागणी करत असल्याने आणि चारित्र्याच्या संशयावरून त्याने या महिलेचा खून केला. यानंतर तिच्या तीन वर्षांच्या मुलाला आळंदी येथे बेवारस अवस्थेत सोडून दिले. पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जयश्री विनय मोरे (वय २७, रा. अॅड्रेस टॉवर, मारुंजी, हिंजवडी) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. तर दिनेश पोपट ठोंबरे (वय ३२, रा. बहुर पो़ करुंज, ता़ मावळ) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीचे लग्न झाले असून त्याला दोन मुले देखील आहेत. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश व जयश्री हे गेल्या ५ वर्षांपासून वाकड येथे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. त्यांना ३ वर्षाचा मुलगा देखील आहे. दिनेशच लग्न झालेले आहे. असे असतांना तो जयश्री सोबत लीव्ह इनमद्धे राहत होता. तर जयश्रीचा देखील ७ वर्षांपूर्वी विवाह झालेला होता. जयश्री ही तिच्या पतीसोबत राहत नव्हती. दरम्यान, जयश्री व दिनेशमध्ये देखील गेल्या काही दिवसांनपासून वाद होत होते. जयश्री ही दिनेशला वारंवार पैसे मागत होती. यावरून तो तीलआया जाब विचारत असे. तसेच जयश्री ही स्वतंत्र राहण्याची मागणी देखील करत होती. त्यामुळे दिनेश तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता.
गेल्या रविवारी (दि २४) दोघेही बाहेर गेले होते. यावेळी ते परत आले असता, भुमकर चौकात कारमध्ये त्यांचे भांडण झाले. या भांडणादरम्यान राग आल्याने दिनेशने जयश्रीच्या डोक्यावर हातोडीने प्रहार केला. हा घाव वर्मी बसल्याने जयश्रीचा जागेरच मृत्यू झाला. दरम्यान, दिनेशने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी थेट साताऱ्यातील खंबाटी घाट गाठला. त्याने जयश्रीचा मृतदेह फेकून दिला. यानंतर पुन्हा पुण्यात येत त्याने वाकड पोलिस ठाण्यात सोमवारी (दि २५) जयश्री ही बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
आरोपी दिनेशने आधी हिंजवडी पोलिसांकडे जाऊन पत्नी मिसिंग असल्याची तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची त्याने योग्य उत्तरे दिली नाही. यानंतर त्याने त्याच्या व जयश्रीच्या ३ वर्षाच्या मुलाला थेट आळंदी येथे बेवारस सोडून दिले. यानंतर त्याने वाकड पोलीस ठाण्यात जाऊन जयश्री हरवली असल्याची तक्रार दिली. आरोपीचा मुलगा हा आळंदी पोलिसांना मिळाला. त्याचे आई वडील शोधण्यासाठी त्यांनी मुलाचा फोटो व्हायरल केला. याच वेळी खांबाटकी घाटात जयश्रीचा मृतदेह सापडला. दरम्यान मुलाचा देखील शोध पोलिसांना लागला. वाकड पोलिसांनी आळंदीहून दिनेशला बोलावून घेतले. यानंतर त्याची चौकशी केल्यावर त्यानेकह जयश्रीचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
संबंधित बातम्या