मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pimpri-chinchwad crime: दारूसाठी पैसे न दिल्याने पोटच्या पोराने आईचे कपडे फाडले; तर भावावर कात्रीने वार

Pimpri-chinchwad crime: दारूसाठी पैसे न दिल्याने पोटच्या पोराने आईचे कपडे फाडले; तर भावावर कात्रीने वार

Jun 13, 2024 10:25 AM IST

Pimpri-chinchwad crime: पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे पोटच्या पोराने दारू साठी आईने पैसे न दिल्याने तिला मारहाण करत तिचे कपडे फाडले. तर भावावर देखील जीवघेणा हल्ला केला.

Pune Crime Newsपुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे पोटच्या पोराने दारू साठी आईने पैसे न दिल्याने तिला मारहाण करत तिचे कपडे फाडले. तर भावावर देखील जीवघेणा हल्ला केला.
Pune Crime Newsपुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे पोटच्या पोराने दारू साठी आईने पैसे न दिल्याने तिला मारहाण करत तिचे कपडे फाडले. तर भावावर देखील जीवघेणा हल्ला केला.

Pimpri-chinchwad crime: पुण्यात किरकोळ कारणावरून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यात व्यसनाधीनांचे प्रामान देखील वाढले आहे. पिंपरी-चिंचवड येथे अशाच एका दारूड्या पोराने आईने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाने आईला मारहाण करून तिचे कपडे देखील फाडले तर मध्ये पडलेल्या भाववर देखील कात्रीने वार करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाकड येथे जगताप डेअरी चौक परिसरात रात्री नऊच्या सुमारास घडली.

Vidhan Parishad Election 2024: शिक्षक-पदवीधर मतदारसंघासाठी ५५ उमेदवार रिंगणात, दिग्गजांची प्रतिष्ठा लागली पणाला!

या प्रकरणी आरोपी मुलाच्या ५५ वर्षीय मुलाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदायर महिलेच्या मुलाला दारूचे व्यसन आहे. त्याने पीडित आई ही घरी एकटी असतांना तिच्या घरी आला. त्याने तिच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र, तिने पैसे देण्यास नकार दिला.

Toll Plaza News : प्रवाशांसाठी खूशखबर! आता टोलनाक्यावर अजिबात रखडपट्टी होणार नाही, NHAI करणार 'ही' उपाययोजना

आईने दारू पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या मुलाने तिच्यावर हल्ला केला. तिला मारहाण केली. ऐवढेच नाही तर तिच्या अंगावरील कपडे देखील फाडले. तिला फरफटत घराबाहेर नेत शिवीगाळ करत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. दरम्यान, यावेळी आईला मद्यपी भावाच्या तावडीतून सोडण्यासाठी मदतीला धावलेल्या मोठ्या भावावर देखील आरोपीने कात्रीने वार केले. या घटनेत भाऊ हा जखमी झाला आहे. तर शेजारील महिला देखील भांडण सोडविण्यासाठी आल्या असता त्यांनाही त्याने शिवीगाळ करीत बघून घेण्याची धमकी दिली.

ट्रेंडिंग न्यूज

Chakan News : चाकण हळहळले! घराच्या छतावर असलेल्या पत्र्यात वीजप्रवाह उतरल्याने करंट लागून आई व मुलाचा दुर्दैवी मृत्यू

यानंतर आरोपी पळून गेला. तक्रारदार महिला व तिच्या मोठ्या मुलाने दवाखान्यात उपचार घेऊन थेट वाकड पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार मद्यपी मुलाचा शोध घेतला जात आहे. या साठी पथके पाठवण्यात आली आहे. 

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर