Pimpri Chinchwad Crime : पुण्यात मुलींवरील अत्याचयाराच्या घटना वाढल्या आहेत. रोज या घटना उघडकीस येत आहे. पिंपरी-चिंचवड येथे देखील एक घटना उघडकीस आली आहे. आईच्या प्रियकराने तिच्या १४ वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचं उघड झालं आहे. या बाबत मुलीने आईकडे तक्रार करूनही तिने दुर्लक्ष केले. मात्र, या मुलीचा संयम संपल्याने तिने ही बाब तिच्या वर्ग शिक्षकांना सांगितली. यानंतर आरोपीच कृत्य उघड झालं. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज धोत्रे असे आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मुलीच्या शाळेतील शिक्षकाने तक्रार दिली आहे.
पीडित मुलीची आई कामावर जाते. तिला एक भाऊ देखील आहे. तिचे वडील वेगळे राहतात. मुलीची आई आणि आरोपीचे प्रेमसंबंध आहेत. रक्षाबंधन दिवशी पंकज धोत्रे मुलीच्या घरी आला. यावेळी मुलीची आई कामावर गेली होती. तर तिच्या भाऊ हा शाळेत गेला होता. घरी कुणी नसल्याचा फायदा धोत्रेने घेतला. त्याने पीडित मुलीला जवळ घेत तिच्याशी लगट करून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. मात्र, मुलीने याला विरोध केला. तिने जोरात ओरडण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने तिला सोडून दिले. या पूर्वी त्याने अनेकदा तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, पीडित मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. मात्र, तिने याकडे दुर्लक्ष केले. उलट मुलीला तुला भास झाला असेल असे मुलीला म्हटलं. वर्षभरापूर्वीही धोत्रेने असेच कृत्य केलं होतं. मात्र मुलीने आईला सांगूनही तिने तुला असा भास झाला असेल असं म्हणत दुर्लक्ष केलं होतं
आईने ऐकले नसल्याने मुलीने ही बाब थेट शाळेतील शिक्षिकेला सांगितली. कारण पूर्वी तिच्या आईने तिचे म्हणणे ऐकून घेतले नव्हते. दरम्यान, मुलीवर झालेला अत्याचार ऐकून शाळेतील शिक्षक देखील हादरले. त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीला अटक केली आहे. त्याला शनिवार पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
पीडित मुलीचे वडील त्यांच्या सोबत राहत नाहीत. पीडित मुलीची आई व आरोपी धोत्रे ही दोघे जण नोकरी करतात. दोघांनी मिळून प्रायव्हेट डिटेक्टिव्ह कंपनी देखील टाकल्याची माहिती आहे. पंकज धोत्रे नेहमीचं मुलीच्या घरी येत होता, अशी तक्रार मुलीने केली आहे.