Pimpri chinchwad accident : पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा अपघात; भरधाव कारची शाळेच्या बसला समोरून धडक, विद्यार्थी जखमी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pimpri chinchwad accident : पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा अपघात; भरधाव कारची शाळेच्या बसला समोरून धडक, विद्यार्थी जखमी

Pimpri chinchwad accident : पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा अपघात; भरधाव कारची शाळेच्या बसला समोरून धडक, विद्यार्थी जखमी

Updated Jul 29, 2024 03:31 PM IST

Car Collided With School Bus In Pimpri Chinchwad: पिंपरी- चिंचवडमध्ये भरधाव कारने शालेय बसला धडक दिली. या धडकेत विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पिंपरी- चिंचवडमध्ये भरधाव कारची शालेय बसला धडक
पिंपरी- चिंचवडमध्ये भरधाव कारची शालेय बसला धडक

Pimpri Chinchwad School Bus Accident News: पिंपरी- चिंचवडमध्ये भीषण अपघात झाला. भरधाव कारने शालेय बसला धडक दिली असून या अपघातात दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना सोमवारी (२९ जुलै २०२४) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. एएनआय वृत्तसंस्थेने या अपघाताचा व्हिडिओ शेअर केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्क परिसरात ही घटना घडली, जिथे भरधाव कारने शालेय बसला समोरून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, बसच्या समोरच्या भागाचा अशरक्ष: चक्काचूर झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याला सुरुवात केली. अपघातग्रस्त शालेय बसमध्ये एकूण १५ विद्यार्थी होते. यातील दोन विद्यार्थ्यांना दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

मुंबई- पुणे महामार्गावर भीषण अपघात; एक ठार, पाच जखमी

गेल्या आठवड्यात लोणावळ्यातील एकवीरा मंदिराच्या दर्शनासाठी निघालेल्या ओवळे गावातील सहा तरुणांच्या वाहनाला जुना मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर, सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. या अपघातात चालक अजय विष्णू गिरे (वय २१) याचा मृत्यू झाला. उर्वरित प्रवासी गजानन देवकर (२२) गंभीर जखमी झाले आहेत, तर निलेश मंजुळकर (१९), सुभाष माळी (२४), ज्ञानेश्वर माळी (२३) आणि गोपाळ माळी (१९) किरकोळ जखमी झाले आहेत. बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

२१ जुलै रोजी या ग्रुपने प्रवासाला सुरुवात केली. सायंकाळी परत येताना ते तळेगाव येथील मित्राच्या घरी थांबले. सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास या गटाने आपला प्रवास पुन्हा सुरू केला. सुरुवातीला गोपाळ माळी गाडी चालवत होते. मात्र, लोणावळा येथे थोड्या विश्रांतीनंतर मृत अजय गिरे स्टेअरिंग व्हीलवर चढला. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू झाला. बीएनएसकलम १०६ (१), १२५ (अ), (ब), २८१, भादंविकलम ३०४ (अ), २७९, ३३८, ४२७ आणि आयपीसी कलम ३०४ (अ) २७९, ३३८ आणि ४२७, १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर