मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PhonePe: वेदांतानंतर 'फोन पे'चं ऑफिस गेलं राज्याबाहेर; सोशल मीडियावर संतापाची लाट
Phone Pay Mumbai Office Shifted To Karnataka
Phone Pay Mumbai Office Shifted To Karnataka (HT)

PhonePe: वेदांतानंतर 'फोन पे'चं ऑफिस गेलं राज्याबाहेर; सोशल मीडियावर संतापाची लाट

22 September 2022, 15:16 ISTAtik Sikandar Shaikh

PhonePe Mumbai Office : फोनपेचं ऑफिस मुंबईतून कर्नाटकात नेण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे. त्यामुळं आता वेदांता प्रकल्पानंतर फोनपेचंही ऑफिस राज्याबाहेर गेल्यानं राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

PhonePe Mumbai Office Shifted To Karnataka : काही दिवसांपूर्वी पुण्यातील तळेगावमध्ये प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉन सेमिकंडक्टर प्रोजेक्ट अचानक गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळं राज्यात राजकीय वादंग पेटलेलं होतं. परंतु आता त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता फोनपे कंपनीनंही आपलं ऑफिस मुंबईतून कर्नाटकात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता या मुद्द्यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वीच एयर इंडियाचं मुख्य कार्यालय गुजरातमध्ये हलवण्यात आलं होतं. त्यानंतर आता फोनपेचं ऑफिसही कर्नाटकात गेल्यानं सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, फोनपेचं मुंबईतील अंधेरीत मुख्य कार्यालय आहे. हे कार्यालय कर्नाटकात हलवण्यासाठी कंपनीच्या मेमोरेन्डम ऑफ असोसिएशननं एक बैठक घेतली. ज्यात मुंबईतील ऑफिस महाराष्ट्राबाहेर म्हणजे कर्नाटकात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा प्रस्ताव आता केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्याता आला असून केंद्रानं मंजुरी दिल्यानंतर फोनपेचं मुख्य कार्यालय मुंबईतून कर्नाटकात शिफ्ट केलं जाणार आहे. याबाबत फोनपे कंपनीनं राज्यातील एका मराठी वृत्तपत्रकात पत्रक जारी करत माहिती दिली आहे. 

<p>Phone Pay Mumbai Office</p>
Phone Pay Mumbai Office (HT)

दरम्यान आता फोनपे कंपनीनं घेतलेल्या या निर्णयावर युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी कंपनीचा हा निर्णय चुकल्याचं सांगितलं आहे. परंतु आता वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवण्यात आल्यानंतर आता फोनपे कंपनीनं आपलं मुख्य कार्यालय कर्नाटकात नेण्याचा निर्णय घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळं आता या मुद्द्यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.