मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Petrol-Diesel Price Today: आजही इंधाचे दर स्थिर; तपासा महाराष्ट्रातील भाव

Petrol-Diesel Price Today: आजही इंधाचे दर स्थिर; तपासा महाराष्ट्रातील भाव

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jul 14, 2022 09:17 AM IST

Petrol-Diesel Price on 14 July 2022: आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

आजचा पेट्रोल डिझेलचा भाव
आजचा पेट्रोल डिझेलचा भाव (Amal KS/HT PHOTO)

Petrol-Diesel Rate Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींमध्ये सध्या अनेक चढ-उतार सुरु आहेत. पेट्रोल-डिझेलच्याही दरात चढ उतार दिसून येत आहेत. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे सुधारित दर जरी केले जातात. अंतिम पेट्रोल दर रिफायनरीज, उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि मूल्यवर्धित कर किंवा व्हॅट जोडून निश्चित केले जातात. ते जोडल्यानंतर, पेट्रोलची किरकोळ विक्री किंमत जवळपास दुप्पट होते. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात– जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील इंधनाच्या दरात सतत चढ-उतार दिसून येत आहे. आज दरात किंचित बदल दिसून येत आहे.

देशातील मुख्य शहरातील दर

आज दिल्लीत पेट्रोलची किंमत ९६.७२ प्रति लीटर आहे तर, डिझेलची किंमत ८९.६२ प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोल १११.३५ रुपये आणि डिझेल ९७.२८ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ आणि डिझेल ९४.२४ प्रति लिटर उपलब्ध आहे. कोलकत्तामध्ये पेट्रोल १०६.०३ आणि डिझेल ९२.७६ प्रति लीटरने उपलब्ध आहे.

महाराष्ट्रातील आजचा दर

महाराष्ट्रातील आजच्या पेट्रोल कालच्या दरापेक्षा ०.५ पैसे तर डिझेलच्या दरात ०.६ पैसे एवढा फरक दिसून येतो.

अहमदनगर : पेट्रोल- १११.४७ डिझेल - ९५.९५

अकोला   : पेट्रोल- १११.१० डिझेल - ९५.६२

अमरावती : पेट्रोल-११२.४६ डिझेल - ९६.९२

औरंगाबाद: पेट्रोल- ११२.८२ डिझेल - ९७.२४

भंडारा     : पेट्रोल- १११.६३ डिझेल - ९६.१३

बीड         : पेट्रोल- ११२.६८ डिझेल - ९७.११

बुलढाणा   : पेट्रोल- १११.८३ डिझेल - ९६.३१

चंद्रपूर       : पेट्रोल- १११.१६ डिझेल - ९५.६९

धुळे           : पेट्रोल- १११.४८ डिझेल - ९५.९७

गडचिरोली : पेट्रोल- १११.९६ डिझेल - ९६.४६

गोंदिया     : पेट्रोल- ११२.६८ डिझेल - ९७.१३

हिंगोली     : पेट्रोल- ११२.६३ डिझेल - ९७.०८

जळगाव    : पेट्रोल- ११२.७५ डिझेल - ९७.१७

जालना      : पेट्रोल- ११३.२९ डिझेल - ९७.६९

कोल्हापूर  : पेट्रोल- १११.८७ डिझेल - ९६.३५

लातूर         : पेट्रोल- ११२.२९ डिझेल - ९६.७५

मुंबई शहर : पेट्रोल- १११.३५ डिझेल - ९७.२८

नागपूर       : पेट्रोल- १११.१८ डिझेल - ९५.६९

नांदेड         : पेट्रोल- ११३.८८ डिझेल - ९८.२८

नंदुरबार      : पेट्रोल- १११.८० डिझेल - ९६.२७

नाशिक       : पेट्रोल- १११.४५ डिझेल - ९५.९२

उस्मानाबाद : पेट्रोल- १११.३४ डिझेल - ९५.८३

पालघर        : पेट्रोल- १११.६९ डिझेल - ९६.१२

परभणी       : पेट्रोल- ११४.३८ डिझेल - ९६.१२

पुणे             : पेट्रोल- १११.७५ डिझेल - ९६.२०

रायगड      : पेट्रोल-१११.१६ डिझेल - ९५.६२

रत्नागिरी    : पेट्रोल- ११२.५८ डिझेल - ९७.००

सांगली     : पेट्रोल- १११.३७ डिझेल - ९५.८७

सातारा     : पेट्रोल- १११.६७ डिझेल - ९६.१३

सिंधुदुर्ग   : पेट्रोल- ११२.९५ डिझेल - ९७.३९

सोलापूर   : पेट्रोल- १११.८३ डिझेल - ९६.३१

ठाणे        : पेट्रोल- ११०.८१ डिझेल - ९५.२८

वर्धा         : पेट्रोल- १११.५५ डिझेल - ९६.०४

वाशिम     : पेट्रोल- १११.५७ डिझेल - ९६.२४

यवतमाळ : पेट्रोल-११२.२२ डिझेल - ९६.६९

जून २०१७ पर्यंत, भारतातील पेट्रोलच्या किंमती दररोज सुधारल्या जातात आणि याला डायनॅमिक इंधन किंमत पद्धत म्हणतात. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता सुधारले जातात. याआधी दर पंधरवड्याला दरात सुधारणा केली जात होती. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.

WhatsApp channel