क्रूरतेचा कळस! पाळीव श्वानाला बेदम मारहाण करून फासावर लटकावून ठार मारलं; पुण्यातील धक्कादायक घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  क्रूरतेचा कळस! पाळीव श्वानाला बेदम मारहाण करून फासावर लटकावून ठार मारलं; पुण्यातील धक्कादायक घटना

क्रूरतेचा कळस! पाळीव श्वानाला बेदम मारहाण करून फासावर लटकावून ठार मारलं; पुण्यातील धक्कादायक घटना

Published Oct 24, 2024 01:20 PM IST

Pune Dog Murder : पुण्यातील पिरंगुट येथे खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एकाने आपल्या पाळीव श्वानाची क्रूरतेचा कळस गाठून हत्या केल्याचं उघड झालं आहे.

क्रूरतेचा कळस! पाळीव श्वानाला बेदम मारहाण करून फासावर लटकावून ठार मारलं; पुण्यातील धक्कादायक घटना
क्रूरतेचा कळस! पाळीव श्वानाला बेदम मारहाण करून फासावर लटकावून ठार मारलं; पुण्यातील धक्कादायक घटना (AFP)

Pune Dog Murder : पुण्यातील पिरंगुट परिसरात पाळीव श्वानाला त्याच्या मालकाने बेदम मारहाण करून त्याला फासावर लटकवून ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या स्ट्रीटडॉग्जबॉम्बे या संस्थेने ही घटना इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या घटनेची दखल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

ओंकार जगताप असे पाळीव कुत्र्याची हत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने क्रूरतेचा कळस गाठत श्वानाची हत्या केली. त्याला आधी बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला फासावर लटकवण्यात आले व ठार मारण्यात आले. या बाबत स्ट्रीटडॉग्जबॉम्बे या संघटनेने केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, अधिकाऱ्यांना या प्रकरणी एक फोन आला होता. व त्याचा मालक त्याला बेदम मारहाण करत असल्याचं म्हटलं आहे. संघटनेचे कार्यकर्ते घटनास्थळी जण्यापूर्वीच श्वानाची हत्या करण्यात आली होती. या श्वानाला आरोपीने गळफास देऊन झाडाला लटकवले होते.

दरम्यान, स्ट्रीटडॉग्जबॉम्बे या संघटनेच्या या पोस्टमुळे प्राणी प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पाळीव श्वानाला न्याय देण्याची मागणी करत आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या तरी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

स्ट्रीटडॉग्ज बॉम्बेने अॅलन इन्स्टाग्राम पोस्टवर ही बाब शेअर केली आहे. प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणारी ही संस्था आहे. यापूर्वी पुण्यात अशीच एक घटना घडली होती. येथील एका स्वयंसेवी संस्थेने एका पिल्लाला जिवंत जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

स्ट्रीटडॉग्ज बॉम्बेने लिहिल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, या श्वानाने या कुटुंबाची इमाने इतबारे सेवा केली. मात्र, त्याच कुटुंबातील एकाने या श्वानाची क्रूरतेने हत्या केली. कृपया या गुन्हेगाराला शिक्षा करण्यास मदत करा. या कुटुंबाने लहान पिल्लू असल्यापासून या श्वानाला वाढवले होते. आरोपीची आई कुत्र्याला नेहमी जाड काठीने बेदम मारहाण करत होती. कुत्र्याच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या जखमा आहेत,' असे फाऊंडेशनने इन्स्टाग्रामवर पोस्ट मध्ये म्हटले आहे.

फाऊंडेशनने सांगितले की, घटनेपूर्वी एका व्यक्तीने त्यांना फोन करत श्वानावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली. जर या कुत्र्याला तुम्ही नेले नाही तर त्याचा जीव देखील जाऊ शकतो. यामुळे फाउंडेशनची टीम तातडीने घटनास्थळी गेली. मात्र, त्यापूर्वीच श्वानाचा मृतदेह हा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

आदित्य ठाकरे यांची कारवाईची मागणी 

या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. पुणे पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "पुण्यात कुत्र्याला त्याच्या मालकाच्या कुटुंबीयांनी फासावर लटकवल्याचं अतिशय विदारक चित्र मी नुकतंच पाहिलं. माणसं असं कसं वागू शकतात हे पाहून मला धक्काच बसला. निवडणूक आणि इतर कामाच्या पलीकडे जाऊन या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी, असे आवाहन मी पुणे पोलिसांना करतो. हे अमानुष आहे. पाळीव प्राणी देखील कुटुंबातील सदस्य आहेत, असे ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर