मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Koregaon Bhima : शौर्यदिनी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची अलोट गर्दी; मध्यरात्री पासून लागल्या रांगा

Koregaon Bhima : शौर्यदिनी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची अलोट गर्दी; मध्यरात्री पासून लागल्या रांगा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 01, 2024 06:35 AM IST

Koregaon Bhima Perne fata vijaystambha shourya diwas: पुणे जिल्हयातील पेरणे फाटा कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मध्यरात्री पासून भीम अनुयायांनी गर्दी केली आहे. आज दिवस भरात या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तसेच चोख पोलिस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे.

Koregaon Bhima Perne fata vijaystambha shourya diwas
Koregaon Bhima Perne fata vijaystambha shourya diwas

Koregaon Bhima Shaurya Din : पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगावाता आज २०६ वा शौर्यदिन साजरा केला जात आहे. त्यामुळं विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे. मध्यरात्री पासून अनेक भीम अनुयायी या ठिकाणी गर्दी करू लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सकाळी ६.३० वाजता विजयस्तंभ या ठिकाणी येत पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. आज दिवस भारत अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांना स्तंभाजवळ पोहचता यावे या ठिकाणी ८ ठिकाणी बस डेपो तयार करण्यात आले आहे. तसेच ठीक ठिकाणी विविध सेवा आणि सुविधा देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. गैर प्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे.

Happy New Year 2024 : नवे संकल्प, नव उत्साहात पुणेकरांनी केले नव्या वर्षांचे जल्लोषात स्वागत; पाहा फोटो

विजयस्तंभाला आकर्षक फुलांची सजावट

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी काल स्तंभाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच विजय स्तंभ परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.

सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. असून यावर्षी अधिक अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेवून अधिक प्रमाणात सुविधा करण्यात आल्या आहेत. २९ ठिकाणी आरोग्य कक्ष उभारण्यात आले आहे. २० फिरते दूचाकी आरोग्य पथक, ५० रुग्णवाहिका ९० तज्ज्ञ डॉक्टर आणि २०० आरोग्य कर्मचारी नियुक्त केलेले आहे. खाजगी रुग्णालयात १०० खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. पुरेशा प्रमाणात औषधसाठादेखील ठेवण्यात आला आहे.

IIT BHU Rape: आयआयटी बीएचयू सामूहिक बालत्कारातील आरोपी भाजप आयटी सेलचे? पक्षाकडून भूमिका स्पष्ट!

दीडशे पाण्याचे टँकर

स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे याकरिता दीडशे पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या माता-भगिनींची काळजी घेण्यात आली असून एकूण पाच हिरकणी कक्ष उभारण्यात येत आहेत. हिरकणी कक्षामध्ये स्तनदा माता व ज्येष्ठ महिला यांना तसेच त्यांच्या समवेत असलेले लहान बालकांसाठी विश्रांती तसेच बालकांच्या मनोरंजनाकरीता खेळणी साहित्य व खाऊ ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी स्वतंत्र महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

परिसरातील विविध ठिकाणी एकूण २ हजार २०० तात्पुरत्या शौचालयांची उभारणी करण्यात आलेली आहे. वापराच्या पाण्यासाठी ४० टँकर आणि स्वच्छतेसाठी ४० सक्शनमशीन व १५ जेटींग मशीन ठेवण्यात आले आहेत. रस्त्यावर कचरा साचू नये याकरीता ५०० कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. स्वच्छतेसाठी २०० सफाई कामागार नियुक्त करण्यात आले आहेत. कचरा उचलण्याकरिता ८० घंटागाड्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांना सुचना देण्यासाठी ठिकठिकाणी ध्वनीक्षेपकांची व्यवस्था ( पब्लीक ॲड्रेस सिस्टिीम) करण्यात आली आहे. सीसीटीव्हीद्वारे परिसरावर नजर राहणार असून त्यासाठी सुसज्ज नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

Mumbai Accident: भरधाव ऑटोच्या धडकेत ५० वर्षीय महिला ठार; मुंबईच्या बोरीवली येथील घटना!

ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी' या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे यांच्या संकल्पनेतून विजयस्तंभ परिसरात बार्टी संस्थेच्यावतीने पुस्तकांचे ३०० स्टॉल उभारले आहेत. बार्टी संस्थेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या जीवनावरील मौल्यवान पुस्तके ८५ टक्के सवलतीच्या दरात अनुयायांना वितरण करण्यात येणार आहेत.

'द प्रॉब्लेम ऑफ रुपी, भारताचे संविधान, संविधान उद्देशिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खंड, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बुद्ध आणि त्याचा धम्म आदी पुस्तके उपलब्ध असून अनुयायांनी बार्टीच्या दालनाला भेट देऊन या पुस्तकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग प्रमुख डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी केले आहे.

सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

सोहळ्यास उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांना घरबसल्या सोहळा पाहता यावा यासाठी सह्याद्री वाहिनीवरून १ जानेवारी रोजी सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सकाळी ६.३० वाजता मान्यवर पाहुणे विजयस्तंभास अभिवादन करतील. ७.३० वाजता समता सैनिक दल, महार रेजिमेंट सेवानिवृत्त सैनिक आणि सैनिक दलातर्फे मानवंदना दिली जाईल. सकाळी ९.३० वाजता ‘डॉ.बी.आर. आंबेडकर विज्डम बुकफेअर’चे उद्घाटन होईल, अशी माहिती बार्टीच्यावतीने देण्यात आली आहे.

WhatsApp channel

विभाग