मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut: संजय राऊत यांचा दसराही कोठडीतच; जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

Sanjay Raut: संजय राऊत यांचा दसराही कोठडीतच; जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 27, 2022 04:01 PM IST

संजय राऊत यांचा दसरा ही आर्थर रोड जेलमध्ये जाणार आहे.संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरीलपुढीलसुनावणी १० ऑक्टोबर रोजी होणार आहे.

संजय राऊत यांचा दसराही जाणार कोठडीतच..
संजय राऊत यांचा दसराही जाणार कोठडीतच..

patra chawl scam : मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ (patra chawl scam) पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पीएमएलए कोर्टाने १० ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलल्याने राऊत यांचा तरुंगातील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांचा दसरा ही आर्थर रोड जेलमध्ये जाणार आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ED) संजय राऊत यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली आहे. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी १० ऑक्टोबर रोजी होणार आहे.

कोट्यवधी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीनासाठीअर्ज केला असून, यावर विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊतच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप ईडीने केला आहे. आज झालेल्या सुनावणीवेळी संजय राऊत न्यायालयात उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

संजय राऊतांच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणीत ईडीकडून युक्तिवाद केला जाणार आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीतही ईडीने संजय राऊत यांच्या जामीनाला जोरदार विरोध दर्शवला होता.

मुंबईतील पत्राचाळ जमीन व्यवहारात गैर प्रकार करून तब्बल १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा संजय राऊत यांचावर आरोप आहे. या प्रकरणी ईडी मार्फत चौकशी सुरू आहे. ईडीने संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी अटक केली होती. यानंतर त्यांना ईडीने ८दिवसांची कोठडी देण्यात आली होती. दरम्यान संजय राऊत यांच्या पत्नीचीही चौकशी ईडीने केली होती. ८ दिवसाच्या कोठडीनंतर राऊत यांना २२ ऑगस्ट पर्यन्त न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. न्यायालयाने संजय राऊत यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात केली होती. न्यायालयाने त्यांना घरचे जेवण तसेच लिहिण्या वाचण्याची परवानगी दिली होती.

WhatsApp channel

संबंधित बातम्या