Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना बसद्वारे मुंबईत सोडणार; प्रशासनाचा निर्णय
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना बसद्वारे मुंबईत सोडणार; प्रशासनाचा निर्णय

Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना बसद्वारे मुंबईत सोडणार; प्रशासनाचा निर्णय

Jul 15, 2024 10:37 AM IST

Konkan Railway : कोकणात पावसाचे धुमशान सुरू आहे. मोठा प्रमाणात झालेल्या पावसामुळे कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी नातुवाडी बोगद्याजवळ माती आणि झाडे ट्रॅकवर कोसळल्याने कोकण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना बसद्वारे मुंबईत सोडणार; प्रशासनाचा निर्णय
कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना बसद्वारे मुंबईत सोडणार; प्रशासनाचा निर्णय (HT)

Konkan Railway : कोकणात पावसाचे धुमशान सुरू आहे. मोठा प्रमाणात झालेल्या पावसामुळे कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी नातुवाडी बोगद्याजवळ माती आणि झाडे ट्रॅकवर कोसळल्याने कोकण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावरील अनेक गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या माघारी पाठवण्यात येणार आहे. तर काही गाड्यांचे मार्ग बदलले जाणार आहे. दरम्यान, रत्नागिरी स्थानकावर कालपासून काही गाड्या थांबल्या आहेत. या गाड्यांत मोठ्या प्रमाणात प्रवासी असून त्यांना आता बसने मुंबईला सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

गेल्या दोन दिवसापासून कोकणाला मुसळधार पावसाने झोडपले आहे. या पवसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी नातुवाडी बोगद्याजवळ माती आणि झाडे ट्रॅकवर कोसळल्याने कोकण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे मार्गावरील दरड दूर करण्याचे काम सुरू आहे. मात्र, काल रात्री पासून अनेक प्रवासी या मार्गावर अडकून पडले आहेत. त्यांना खायला आणि प्यायला देखील मिळालेले असल्याने त्यांचे हाल झाले आहे. यात लहान मुळे आणि वृद्ध व्यक्तीची संख्या मोठी आहेत.

रत्नागिरी स्थानकावर काही रेल्वे गाड्या थांबून ठेवण्यात आल्या होत्या. या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी अडकून पडले आहेत. अनेक प्रवाशांनी कोकण रेल्वेच्या कारभारावर टीका देखील केली. तसेच या मार्गावरची वाहतूक ही कधी सुरळीत होईल या बाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तब्बल १५ ते १६ तास प्रवासी एकाच स्थानकावर अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या बाबतीत प्रशासाने मोठा निर्णय घेतला आहे. पावसामुळे कोकण रेल्वे ठप्प, रत्नागिरी रेल्वेस्थानकावर अडकलेल्या प्रवाशांना बसद्वारे मुंबईत सोडलं जाणार आहे. रत्नागिरी- कोकण रेल्वे ठप्प झाल्यामुळे या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीची व्यवस्था केली जाणार आहे. येथील विविध स्थानकावरुन अडकलेल्या प्रवाशांना एसटी बसने मुंबईला सोडले जाणार आहे. या साठी रत्नागिरी स्थानकावरून २५ बस सोडल्या जाणार आहेत.

कोकण रेल्वे मार्गावरी गाड्या रद्द तर काही वळवल्या

कोकण रेल्वे मार्गावर खेड जवळ कशेडी बोगद्यासमोर दरड कोसळल्याने या मार्गावरील मार्गावरील रेल्वे सेवा ही ठप्प झाली आहे. या मार्गावरील अनेक रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत. तर काही गाड्या वळवल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ८ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर १२ गाड्या या इतर मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर