Man Died in Pune metro station : पुण्यातील मेट्रो प्रवासाला पुणेकरांनी पसंती दिली आहे. रोज हजारोच्या संख्येने पुणेकर मेट्रोने प्रवास करत असतात. मात्र, या पुणे मेट्रोला दुर्घटनेचे गालबोट लागले आहे. सोमवारी एका प्रवाशाचा जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना नेमकी कशी झाली याचा पोलिस शोध घेत आहेत.
मनोज कुमार (वय ४०) असे जिन्यावरून पडून मृत्यू झालेल्या प्रवाशांचे नाव आहे. सोमवारी मेट्रोतून प्रवास करतांना स्थानकावरून मनोज कुमार हे जात होते. यावेळी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून मनोज कुमार हे अचानक खाली कोसळले. यावेळी मनोज कुमार यांना मेट्रो कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मनोज कुमार यांचा मृत्यू झाला होता. मनोज कुमार यांच्या मृत्यूचे करण नेमके समजले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज कुमार यांच्या मृत्यूप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. मनोज कुमार हे सायंकाळी ६.३० वाजता जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकातील सरकत्या जिन्यावरून जात होते. यावेळी मनोज कुमार हे अचानक सरकत्या जिन्यावरून खाली पडले. ही घटना स्थानकातील सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने मनोज कुमार यांना स्थानकातील आपत्कालीन वैद्यकीय कक्षात नेण्यात आले. या ठिकाणी डॉक्टर आणि परिचारिकेने त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार केले. मात्र, मनोज कुमार यांची प्रकृती ही गंभीर असल्याने त्याला जवळील खासगी रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिली आहे. मनोज कुमार यांचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मनोज कुमार या प्रवाशाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट झाले नाही. शवविच्छेदन अहवालावरून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. या प्रवाशाला काही आजार होता का, याचाही तपास पोलिस करणार आहे. तसेच मेट्रो स्थानकातील सीसीटीव्ही देखील पोलिस तपासणार आहेत. मृत मनोज कुमार याच्या भावाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या