Chembur Metro construction collapses : चेंबूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी मेट्रोचे बांधकाम सुरु असताना अर्धवट बांधकामाचा मोठा भाग हा शेजारी असलेल्या रहिवासी सोसायटीवर कोसळला आहे. लोखंडी सळयांचा मोठा सांगाडा या इमारतीवर कोसळला आहे. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झालेली नाही. मात्र, सोसायटीचे काही नुकसान झाले आहे. ही घटना सायन ट्रॉम्ब रोडच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर घडली आहे. सध्या कोसळलेला लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे मेट्रोच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
चेंबुर येथे वडाळा येथे जाणाऱ्या मेट्रोचे काम सुरू आहे. हे काम करतांना लोखंडी सळया असलेल्या मोठा सांगाडा उभारण्याचे काम सुरू होते. मात्र, याला कोणताही आधार देण्यात आलेला नव्हता. हा सळ्याचा टॉवर थेट चेंबूरमधील सुमन नगर सोसाइटीवर कोसळला. मेट्रोचे अर्धवट बांधकाम कोसळल्यामुळे सोसायटीतील राहिवाश्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. तब्बल २० फूट सळया टाकून त्यांचा एक मोठा टॉवर उभा करण्यात आला. हाच टॉवर रहिवासी सोसायटीत कोसळला.
चेंबरच्या सायन परिसरात मेट्रोसाठी पूल टायर केला जात आहे. या पुळसाठी सळ्या टाकून एक मोठा पिलर तयार केला जात होता. मात्र, हाच लोखंडी सळयाचा टॉवर हा बाजूच्या राहिवासी सोसायटीवर कोसळला. हे काम सोसायटी सुरक्षा रक्षकाच्या रुमवर पडला. सुदैवाने या वेळी तेथे सुरक्षा रक्षक नसल्याने तो बचावला. या घटनेमुळे सोसायटीतील नागरिकांनी मेट्रोच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. सुमननगरच्या सिग्नलवर ही घटना घडली होती. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झाली होती. या घटनेची माहिती मिळताचं पालिका प्रशासन व मेट्रोचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून कोसळलेला लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कोणताही सपोर्ट न देता या हा सळयांचा टॉवर उभा करण्यात आला होता. सुदैवाने हा भाग डाव्या साईडने पडला. जर हा भाग उजव्या साइडला पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. प्रशासनाने ही घटना नेमकी कशी घडली या साठी चौकशी सुरू केली आहे.
संबंधित बातम्या