Parth Pawar: पार्थ पवारांचा अमोल मिटकरींना इशारा; मी व माझा पक्ष म्हणत ‘त्या’ लेखावरून चांगलंच खडसावलं
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Parth Pawar: पार्थ पवारांचा अमोल मिटकरींना इशारा; मी व माझा पक्ष म्हणत ‘त्या’ लेखावरून चांगलंच खडसावलं

Parth Pawar: पार्थ पवारांचा अमोल मिटकरींना इशारा; मी व माझा पक्ष म्हणत ‘त्या’ लेखावरून चांगलंच खडसावलं

Nov 27, 2024 06:53 PM IST

Parth Pawar On Amol Mitkari : अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांनी अमोल मिटकरींना खडसावलं आहे. पार्थ पवारांनी इंग्रजीतून ट्विट करत मिटकरींना घरचा आहेर दिला आहे.

पार्थ पवारांचा अमोल मिटकरींना इशारा
पार्थ पवारांचा अमोल मिटकरींना इशारा

parth pawar criticizes amol mitkari : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत जनतेचा कौल महायुतीच्या बाजुने लागला. निवडणुका पार पडताच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदारअमोल मिटकरी नव्या वादात अडकले आहेत. यानंतर त्यांच्यावर टीका होतअसतानाच अजित पवारांचे पुत्रपार्थ पवारांनी अमोल मिटकरींना खडसावलं आहे.पार्थ पवारांनी इंग्रजीतून ट्विट करत मिटकरींना घरचा आहेर दिला आहे.

पार्थ पवारांनी काय केलं आहे ट्विट -

पार्थ पवार यांनी इंग्रजीमधून ट्विट करत म्हटले की, हे अत्यंत दुर्दैवी आहे की अमोल मिटकरी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेणे पसंत केले आहे. डिझाइन बॉक्स आणि नरेश अरोरा संदर्भातील त्यांच्या वक्तव्याचा माझा पक्ष आणि माझे वडिल अजिबात समर्थन करत नाहीत. या प्रकरणावर अशा प्रकारची टिप्पणी व मीडियाशी संवाद साधू नये असा इशाराही पार्थ पवारांनी मिटकरींना दिलाआहे.

काय आहे प्रकरण?

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी निवडणूक कॅम्पेन पीआर कंपनी डिझाईन बॉक्स तसेच कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांनी केले होते. निवडणुकीत यश मिळाल्यानंतर नरेश अरोरा यांनी अजित पवारांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. मात्र,यावेळी त्यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवल्याने वाद निर्माण झाला आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी नरेश अरोरा यांना अमोल मिटकरींनी झापलं होतं. शेवटी तुम्ही पगारीवरील शिपाई असल्याचा टोलाही त्यांना लगावला होता. आता अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी या वादात उडी घेतली असून मिटकरींना सुनावले आहे. 

विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या मीडिया कॅम्पेनिंगमध्ये नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीनेही पीआर एजन्सी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अजित पवारांचं गुलाबी कॅम्पेन डिझाइन बॉक्स कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. त्यामुळे, आता विजयानंतर श्रेयवादाची लढाई पाहायला मिळत आहे. अमोल मिटकरी यांनी नरेश अरोरा यांच्यावर टीका करत थेट तुम्ही पगारी शपाई असल्याचं म्हटलं. तर, आज एका वर्तमानपत्रात लेख लिहित यशाचे डिझाईन राष्ट्रवादीचेच असा टोलाही लगावला.

याआधी राष्ट्रवादी आणि आमदार अमोल मिटकरींमध्ये ट्विटर वॉर रंगलं होतं. हे पण तुम्ही आम्हाला सांगणार का? असं म्हणत मिटकरींनी पक्षालाच सवाल विचारला होता. अमोल मिटकरींनी डिझाइन बॉक्सवर व नरेश अरोरा यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. त्यानंतर आता पार्थ पवारांनीही मिटकरींना सुनावलं आहे.

Whats_app_banner