परभणी दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहात झाला मृत्यू, शहरात पुन्हा तणावाची शक्यता
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  परभणी दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहात झाला मृत्यू, शहरात पुन्हा तणावाची शक्यता

परभणी दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहात झाला मृत्यू, शहरात पुन्हा तणावाची शक्यता

Dec 15, 2024 01:15 PM IST

Parbhani Protest : परभणी दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परभणीत पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केलं आहे.

परभणी दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहात झाला मृत्यू, शहरात पुन्हा तणावाची शक्यता
परभणी दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहात झाला मृत्यू, शहरात पुन्हा तणावाची शक्यता

Parbhani Protest : परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला काल हिंसक वळण लागले होते. परभणीत आंदोलकांनी दगडफेक, जाळपोळ केली होती. या प्रकरणी पोलिसांनी ५० जणांना ताब्यात घेतले होते. यातील एका तरुणाचा आज न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे. या तरुणाच्या मृत्यूमुळे परभणीत पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ सूर्यवंशी (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याची प्रकृती खराब झाल्यावर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. या प्रकारामुळे परभणी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच नांदेड परिक्षेत्राचे आयजी शाहजी उमाप हे परभणीत दाखल झाले असून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू नेमका कासा झाला या बाबत माहिती स्पष्ट झालेली नाही. या तरुणाच्या मृतदेहाचे न्यायाधीशांच्या उपस्थितीत शवविच्छेदन केले जाणार आहे. त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड करण्यात आली होती. यामुळे परभणीत आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. आंदोलकांनी दगडफेक, जाळपोळ केला होता. यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी व जमावाला पंगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला होता. तसेच जमावबंदी व इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तसेच याप्रकरणी ५० जणांना अटक देखील करण्यात आली होती. बुधवारी ही घटना झाली होती. 

आंदोलनावेळी अनेक ठिकाणी तोडफोड करत वाहनांचे टायर जाळले होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयात देखील तोडफोड करण्यात अलि होती. ताब्यात घेण्यात आलेल्या ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणीत सध्या जमाबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती शहाजी उमाप यांनी दिली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर