सासऱ्यानेच सुनेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार परभणी जिल्ह्यातील जिंतूरमधून समोर आला आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे शहरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेच्या पतीला दारूचे व्यसन असून तो काहीच काम धंदा करत नाही. दिवसरात्र नशेत असतो. म्हणून सासऱ्याने पीडितेला पिठाची गिरणी टाकून दिली होती. त्या माध्यमातून पैसे कमवून ती घर चालवत होती. यावरुन सासऱ्याने तिला सुनावले होते. केलेल्या उपकारांची परतफेड कर म्हणत सासऱ्याने दुपारच्या वेळी घरात कुणी नसताना पीडितेकडे शरीरसुखाची मागणी करत तिच्यावर अत्याचार केला.
तसंच,मी तुझा पूर्ण सांभाळ करेन तु माझ्या पत्नीसारखीच आहेस. याबबात कोणाला सांगू नकोस,असं म्हणत पीडित महिलेला धमकावले.
सासऱ्याने सुनेवर अत्याचार केल्यानंतर ती खूप घाबरली होती. मात्र वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून हिंमत करत तिने जिंतूर पोलीस स्थानक गाठून सासऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. पीडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या नराधम सासऱ्यांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात संपात व्यक्त करण्यात येत आहे.
नवी मुंबईच्या पनवेलमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. मोठ्या बहिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी १३ वर्षाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला, जेव्हा तिचे आई-वडील गर्भपात करण्यासाठी तिला वाशी सामान्य रुग्णालयात घेऊन गेले. यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली.
याप्रकरणी पीडिताची विचारपूस केली असता तिने सांगितले की, तिच्या लहान भावाने एकत्र पॉर्न पाहिल्यानंतर तिला गरोदर केले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता, पण ते अपयशी ठरले. पण पुढच्याच महिन्यात म्हणजेच जानेवारीत मुलीने नकार दिल्यानंतरही मुलाने तिच्यावर बलात्कार केला. पीडिताने मासिक पाळी चुकल्याने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला.
संबंधित बातम्या