Parbhani Murder: हॉटेलमध्ये नाश्ता देण्यावरून वाद, ग्राहक तरुणाची हत्या, तिघांविरोधात गुन्हा दाखल!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Parbhani Murder: हॉटेलमध्ये नाश्ता देण्यावरून वाद, ग्राहक तरुणाची हत्या, तिघांविरोधात गुन्हा दाखल!

Parbhani Murder: हॉटेलमध्ये नाश्ता देण्यावरून वाद, ग्राहक तरुणाची हत्या, तिघांविरोधात गुन्हा दाखल!

May 03, 2024 07:05 PM IST

Parbhani Jintur Murder: परभणीच्या जिंतूर येथे नाश्ता देण्याच्या वादावरून हॉटेल मालकासह चार जणांनी एका ग्राहकांची हत्या केली.

परभणीत नाश्ता देण्याच्या वादावरून एकाची हत्या करण्यात आली.
परभणीत नाश्ता देण्याच्या वादावरून एकाची हत्या करण्यात आली.

Parbhani Crime: परभणीच्या जिंतूरमध्ये धक्कादायक घटना घडली. हॉटेलमध्ये नाश्ता देणाच्या वादावरून एका ग्राहकाची हत्या करण्यात करण्यात आली. याप्रकरणी हॉटेल मालकासह इतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Akola Accident : अकोल्यात भीषण अपघात, आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, अजगर शेख ख्वाजा असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ख्वाजा हे महाराष्ट्र सुरक्षा बल मुंबईत नोकरी करत असून सु्ट्टीनिमित्त जिंतूर तालुक्यातील केळा या गावी गेले होते. मुंबईकडे येताना ख्वाजा हे जिंतूर येथील सपना हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले. त्यावेळी ख्वाजा आणि हॉटेल मालक शेषराव आव्हाड, त्यांचा मुलगा अमोल, बलाजी रणखांबे आणि इम्रान कुरेशी यांच्यात वाद झाला. यानंतर या चौघांनी ख्वाजाला बेदम मारहाण केली.

Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांकडून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या

या भांडणात ख्वाजा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच जिंतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकासह एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी जिंतूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा मृत्यू

फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील हवालदाराचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, विशाल पवार (वय, २०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. विशाल हे मुंबई पोलिसांच्या वरळी लोकल आर्म्स डिव्हिजन-३ मध्ये कार्यरत होते. दरम्यान, २८ एप्रिल रोजी लोकलमधून प्रवास करताना माटुंगा आणि सायन स्थानकांदरम्यान फटका गँगमधील एका व्यक्तीने विशाल यांच्या हातावर फटका मारला. त्यावेळी त्यांच्या हातातील फोन खाली पडला. यानंतर यानंतर हा फोन घेऊन फटका गँगने पळ काढला. लोकलचा वेग कमी असल्याने विशाल यांनी खाली उतरून फटका गँगचा पाठलाग केला. काही अंतरावर गेल्यानंतर फटका गँगने विशाल यांना घेरले आणि धक्काबुक्की केली. विशाल यांनी प्रतिकार केला असता फटका गँगने त्यांच्या पाठीत विषारी इंजेक्शन टोचले. यानंतर तीन दिवसांनी उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर