Parbhari News: परभणीत एका व्यक्तीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेत महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मृत महिलेच्या बहिणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी परभणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मैना काळे असे मृत महिलेचे नाव आहे. मैना यांचे काही वर्षांपूर्वी आरोपी कुंडलिक काळे (वय, ३२) याच्याशी विवाह झाला होता. त्यांना तीन मुली आहेत. नैना यांनी तीन मुलींना जन्म दिल्याने आरोपी कुंडलिक वारंवार तिच्या भांडण करते असे. दरम्यान,गुरुवारी रात्री अशाच एका वादानंतर आरोपीने मैना यांच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. पेटलेल्या अवस्थेत मैना घराबाहेर पळाल्यानंतर आजूबाजुच्या लोकांनी आग आटोक्यात आणून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर पीडितेच्या बहिणीने मुंबई पोलिसांना माहिती दिली आणि तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी आपल्या पत्नीला तीन मुलींना जन्म देण्यावरून टोमणे मारत असे आणि या मुद्द्यावरून वारंवार तिच्याशी भांडत असे. गुरुवारी रात्री अशाच एका वादानंतर त्याने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना महिलेचा मृत्यू झाला, असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
संबंधित बातम्या