HSC Exam News : राज्यात मंगळवारपासून बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. बारावीचा पहिला पेपर हा इंग्लिशचा होता. मात्र, या पेपरसाठी एका तोतया विद्यार्थ्याला बसवण्यात आल्याचं समोर आलं आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी तांडा येथील कै. रेखाजी नाईक आश्रम शाळेवरील परीक्षा केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला आहे. या बोगस परीक्षार्थीने केंद्रांवर येऊन परीक्षा देखील दिली. मात्र, त्याने सही वेगळी केल्याने त्यांचं बिंग फुटलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने जोरदार तयारी केली होती. असे असतांना देखील राज्यात ४२ केंद्रांवर कॉपीची प्रकरणे झाल्याचे पुढे आले आहे.
राज्यात सध्या १२ वीच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथक तैनात करण्यात आले आहे. असे असतांना राज्यातील अनेक केंद्रांवर जोमात कॉपी सुरू असल्याचं व काही गैरप्रकार झाल्यास समोर आलं आहे .
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी तांडा येथील कै. रेखाजी नाईक आश्रम शाळेतील परीक्षा केंद्रावर मंगळवारी १२ वीच्या पहिल्या इंग्रजी विषयाच्या पेपरला एक तोतया विद्यार्थी बसल्याचं समोर आलं आहे. वैभव केशवराव कदम या विद्यार्थ्याने त्याच्या ऐवजी दुसरा परीक्षार्थी बसवला. या बनावट परीक्षार्थीने पेपरही दिला. दरम्यान, केंद्रांवर तपासणी सुरू असतांना शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांनी परीक्षा केंद्राला भेट देऊन पाहणी करत असतांना हा प्रकार उघडकीस आला. ससाणे यांनी या प्रकरणी केंद्र प्रमुखांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार केंद्र प्रमुख अंकुश भोसले यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात वैभव केशवराव कदम याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ मॉल प्रॅक्टिस एक्ट युनिवर्सिटी,बोर्ड अँड ऑदर स्पेसिसाईट एक्झामिनेशन ए अॅक्ट ०७ हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील १२ वी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठि बोर्डामार्फत मोठी तयारी करण्यात आली होती. मात्र, पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला राज्यात तब्बल ४२ केंद्रांवर कॉपीच्या घटना उघडकीस आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेल्या आदेशानुसार या केंद्राची मान्यता रद्द होते का ? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी सरकार गंभीर असल्याचं बोर्डाने म्हटले होते. मात्र, पहिल्याच पेपर दिवशी ४२ ठिकाणी कॉपीची प्रकरणे समोर आले आहे. सर्वाधिक कॉपीचे प्रकारहे छत्रपती संभाजी नगरमध्ये उघडकीस आले आहेत. या ठिकाणी २६ केंद्रांवर कॉपी प्रकरणाची नोंद झाली आहे.
संबंधित बातम्या